Madhya Pradesh: पती-पत्नी म्हणून ८ वर्षे संसार केला; मृत्यूनंतर ‘ते’ रहस्य उलगडलं, सगळ्यांना बसला धक्का – madhya pradesh two young man live like husband wife for 8 years in sehore


सीहोर (मध्य प्रदेश): पती-पत्नी म्हणून आयुष्य एकत्र घालवण्यासाठी दोघांनी लग्न केलं. आपला ‘राज’ जगापासून लपवण्यासाठी त्यांनी मुलगाही दत्तक घेतला. मात्र, एक दिवस दोघांमध्ये वाद झाला. पत्नीनं स्वतःला पेटवून घेतले. यात ती गंभीररित्या होरपळली. पती तिला वाचवण्यासाठी गेला. तोही गंभीररित्या होरपळला. उपचारांदरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. मृत्यूनंतर विच्छेदन अहवाल प्राप्त झाला तेव्हा, सगळेच हैराण झाले. मृत्यू झालेली महिला ही एक तरुण असल्याचे त्यातून स्पष्ट झाले. ते दोघेही पुरूष असल्याचे उघडकीस आले. ते दोघे आठ वर्षे पती-पत्नी म्हणून राहत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शुजालपूरच्या एका तरुणाचे कालापीपल भेसवा येथील तरुणावर प्रेम जडले. २०१२ मध्ये दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. तरुणाच्या कुटुंबीयांची याला सहमती होती. मात्र, त्यांना मुलगी कोण आहे याविषयी काहीही माहिती नव्हते. प्रेमविवाह केल्यानंतर दोघेही सीहोरमध्ये राहू लागले. दोन वर्षांनी तरुणाच्या कुटुंबीयांनी मूल व्हावं म्हणून हट्ट धरला. त्यामुळे त्या दोघांनी मोठ्या भावाच्या मुलाला दत्तक घेतलं.

प्रियकराच्या हातात हात घालून फिरत होती पत्नी, व्यापाऱ्याने भररस्त्यात चोपले

पत्नीला बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडले; पतीने चपलेने थोबडवले, व्हिडिओ व्हायरल

मैत्रीनं केला घात! गळ्यातील सोन्याच्या चेनसाठी मित्रांनीच केली तरुणाची हत्या

‘तिने’ स्वतःला पेटवून घेतले

११ ऑगस्ट २०२० रोजी रात्री पती-पत्नीमध्ये वाद झाला. भांडण झाल्यानंतर पत्नीने स्वतःला पेटवून घेतले. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात तोही होरपळला. दोघांना उपचारासाठी भोपाळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान १२ ऑगस्ट रोजी पत्नीचा आणि चार दिवसांनी पतीचा मृत्यू झाला. दोघांचे शवविच्छेदन अहवाल पोलिसांना मिळाले त्यावेळी त्यांना धक्काच बसला. पत्नी म्हणून राहणारी महिला नव्हे तर पुरूष असल्याचे स्पष्ट झाले. दोघेही तरूण पती-पत्नी म्हणून राहत होते. ते दोघेही आठ वर्षांपासून एकत्र राहत होते. त्यांनी लग्नही केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय; पती, सासऱ्याने केली तरुणाची हत्या

हॉटेलच्या बिलावरून वाद; काँग्रेस नगरसेवकाला मारहाणSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *