Kolhapur News : Hasan Mushrif: नुसत्या नोटाच छापू नका!; मुश्रीफांचा खासगी डॉक्टरांना ‘हा’ सल्ला – covdi 19 updates hasan mushrif warns private doctors who charge high bills to patients


कोल्हापूर: ‘खासगी डॉक्टरांनो, करोना उपचाराच्या नावाखाली नुसत्या नोटाच छापू नका. माणुसकीचा ओलावाही जिवंत ठेवा’, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खासगी डॉक्टरांना फटकारले. आगतिक करोना बाधित रुग्णांचा केवळ गैरफायदा न घेता, समाजाची सेवाही करा, असा सल्लाही त्यांनी डॉक्टरांना दिला. ( Maharashtra Minister Hasan Mushrif Warns Private Doctors )

वाचा: करोनाचे थैमान; महाराष्ट्राने ओलांडला १० लाखांचा टप्पा, आज २४८८६ नवे रुग्ण

कागल येथे हसन मुश्रीफ फाऊंडेशन, खासगी डॉक्टर डॉ. अमर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील कोविड हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमात मुश्रीफ बोलत होते. यावेळी नगरसेवक प्रवीण काळबर यांनी सुरु केलेल्या रुग्णवाहिकेचाही शुभारंभ झाला. तसेच करोना संसर्गातून बरे झालेले कागलमधील हिंदुराव परसू पसारे (वय ७५) व त्यांच्या पत्नी सुलोचना हिंदुराव पसारे (वय ७०)या जोडप्याच्या हस्ते मंत्री मुश्रीफ यांचा सत्कार झाला.

वाचा: ९० वर्षीय कल्लाप्पाण्णा ठणठणीत; आवाडे कुटुंबातील सर्व १८ जण करोनामुक्त

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात माझं कुटुंब-माझी जबाबदारी अभियानाची घोषणा केली आहे. त्याबाबतही मुश्रीफ यांनी नागरिकांना आवाहन केले. मुश्रीफ म्हणाले, ‘माझं कुटुंब -माझी जबाबदारी’ हे अभियान प्रभावीपणे राबवूया, घराघरात जाऊन कुटुंबातील सदस्यांना ताप आहे का?, ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे? याची तपासणी करून जे संभाव्य रुग्ण असतील त्यांची चाचणी करून त्यांच्यावर तातडीने उपचार करूया. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर हा या योजनेचा पहिला टप्पा असेल. १२ ते २४ ऑक्टोबर हा या योजनेचा दुसरा टप्पा असेल आणि २५ ऑक्टोबरला करोनारूपी राक्षसाचा वध करण्याचा निर्धार करुया, असे ते पुढे म्हणाले.

वाचा: ‘सगळी खबरदारी घेत होतो, पण करोनाचा संसर्ग झालाच’

हातात हात घालून काम करूया…

समरजितसिंह घाटगे हे हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक मानले जातात. मुश्रीफ यांनी त्यांचे नाव न घेता त्यांना या संकटकाळात एकत्र येण्याचे आवाहन केले. मुश्रीफ म्हणाले, ‘त्यांचा साखर कारखाना आहे. आवश्यक साधन सामग्रीही तयार आहे. त्यांनीही एखादे कोविड सेंटर सुरू करावे. जनतेच्या सेवेसाठी हातात हात घालून काम करूया. या संदर्भातील त्यांच्याशी चर्चेलाही मी तयार आहे. अशा महाभयानक संकट काळात जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे, हे आम्हा सर्वांचे आद्यकर्तव्य आहे.’

वाचा: पुण्यात ऑक्सिजनचा तुटवडा, आता खूप झालं…!; अधिकाऱ्यांवर भडकले अजितदादाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *