kanpur: प्रियकराच्या हातात हात घालून फिरत होती पत्नी, व्यापाऱ्याने भररस्त्यात चोपले – husband caught red handed wife with her lover in kanpur in uttar pradesh


कानपूर: उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये भररस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. प्रियकरासोबत हातात हात घालून फिरणाऱ्या महिलेला तिच्या पतीने रंगेहाथ पकडले. पतीने पत्नीच्या प्रियकराला भररस्त्यात चपलेने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा गोंधळ पाहून तिथं बघ्यांची गर्दी जमली. तेथून ये-जा करणाऱ्या काही जणांनीही हात धुवून घेतले. त्यांनीही या प्रियकराला कानफटवले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पत्नीसह तिच्या प्रियकराला आणि पतीलाही पोलीस ठाण्यात नेले.

फीलखाना परिसरात मॉलरोडवर रात्री उशिरा अचानक रस्त्यावर गोंधळ सुरू झाला. हरबंश मोहालमध्ये राहणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या पत्नीचे (वय ४२) परिसरातच राहणाऱ्या एका व्यापारी तरुणासोबत प्रेमसंबंध होते. तिच्या पतीला संशय आला होता. स्थानिकांनीही त्या दोघांच्या प्रेमसंबंधांबाबत व्यापाऱ्याला सांगितले होते. तो त्याच्या पत्नीवर लक्ष ठेवू लागला. पती घरात नसताना ती प्रियकराला घरी बोलावायची. तसेच ते दोघे फिरायलाही जायचे. पत्नीच्या प्रेमसंबंधांची चर्चा संपूर्ण परिसरात होत होती. त्याचवेळी पत्नी प्रियकरासोबत फिरत असल्याचे त्याला समजले. त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराला रंगेहाथ पकडले. त्यानंतर पतीने मित्रांच्या मदतीने तिच्या प्रियकराला चपलेने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कपडे फाटेस्तोवर त्याला चोपले.

पत्नीला बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडले; पतीने चपलेने थोबडवले, व्हिडिओ व्हायरल

नगर: दरोडेखोर घरात घुसले अन्… केडगावमध्ये मध्यरात्री सशस्त्र दरोडा

आश्चर्याची बाब म्हणजे इतकं सारं होऊनही ती प्रियकराला त्यांच्यापासून वाचवायचा प्रयत्न करत होती. प्रियकराला मारहाण करणाऱ्या जमावाच्या तावडीतून त्याची सुटका करण्याचा प्रयत्न ती करत होती. काही वेळाने पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पत्नी, तिचा प्रियकर आणि तिच्या पतीसह मित्रांनाही पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांच्या माहितीनुसार, महिलेचा पती आणि प्रियकर हे दोघेही किराणा मालाचे व्यापारी आहेत. दोघांनीही आपांपसात मिटवून घेतले आहे. त्यांनी परस्परांविरोधात कोणतीही तक्रार दिली नाही.

भाजप नेता तरुणीचा करत होता पाठलाग; चपलेनं मारलं, व्हिडिओ व्हायरल

पत्नीची हत्या करून ‘तो’ पोहोचला थेट पोलीस ठाण्यातSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *