Kallappa Awade: Kallappa Awade: ९० वर्षीय कल्लाप्पाण्णा ठणठणीत; आवाडे कुटुंबातील सर्व १८ जण करोनामुक्त – 90 year old former congress mp kallappa awade beats covid 19


कोल्हापूर: आवाडे कुटुंबातील एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १८ जणांना करोनाने गाठले. पण या सर्वांनीच करोनावर मात केली. विशेषत: ९० वर्षांचे असलेले माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनीही त्याच्यावर मात करत ठणठणीत झाले. यामुळे आंनदीत झालेल्या कुटुंबियांनी इचलकरंजी येथील त्यांच्या निवासस्थानी फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत केले. ( Former Congress MP Kallappa Awade beats Covid 19 )

वाचा: ‘सगळी खबरदारी घेऊनही करोनाचा संसर्ग झालाच’

गेले साठ ते सत्तर वर्षे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात असलेले आवाडे हे वजनदार नाव. संयुक्त कुटुंब कसे असावे याचे हे आदर्श उदाहरण. आजी, आजोबा, मुले, सूना, नातवंडे आणि पतवंडे असे घरात २२ सदस्य. अतिशय गुण्यागोविदाने नांदणारे हे कुटुंब. जिल्ह्यात करोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आमदार प्रकाश आवाडे त्याच्या विरोधात काम करत आहेत. गेल्या महिन्यात त्यांच्या आई आणि कल्लाप्पा आवाडे यांच्या पत्नी इंदुमती आवाडे यांचे निधन झाले. सांत्वनासाठी अनेकजण घरी आले. यातूनच करोनाचाही या घरात शिरकाव झाला. तेथूनच एक नवी लढाई सुरू झाली.

वाचा: पुण्यात ऑक्सिजनचा तुटवडा, आता खूप झालं!; अधिकाऱ्यांवर भडकले अजितदादा

प्रथम आमदार प्रकाश आवाडे यांना करोनाची बाधा झाली. त्यानंतर एकेक करत घरातील सर्वांनाच त्याची लागण झाली. चार वर्षाच्या मुलापासून ते ९० वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्वांवर उपचार सुरू झाले. काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर काहींनी घरातच उपचार घेत या करोना विरोधात जवळजवळ महिनाभर लढा दिला. शेवटी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी देखील शुक्रवारी करोनावर मात केली. महिनाभर उपचार घेतल्यानंतर सकाळी त्यांना घरी आणण्यात आले. यावेळी त्यांच्यावर फुलांची उधळण करत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

वाचा: चिंताजनक उच्चांक! २४ तासांत आढळले ९६,५५१ करोना रुग्ण

याबाबत बोलताना आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, घरातील बहुतेक सर्वांनाच करोनाची बाधा झाल्याने पहिल्यांदा आम्ही घाबरलो. पण नंतर त्याला धैर्याने सामोरे गेलो. लहान मुलांनी देखील धाडसाने त्यावर मात केली. त्यामुळे सारे कुटुंब आज करोनामुक्त झाले याचा अधिक आनंद आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. दररोज एक हजाराच्या आसपास नवीन रुग्णांची भर पडत आहे. एकूण रुग्णसंख्येने आतापर्यंत ३२ हजाराचा आकडा ओलांडला आहे त्यामुळे चिंतेचे वातावरण असले तरी थोडंसं धैर्य दाखवलं तर करोनावर मात करता येऊ शकते, हे आवाडे कुटुंबाने दाखवून दिले आहे.

वाचा: १०३ वर्षांच्या आजीची करोनावर मातSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *