india news News : रामविलास पासवान रुग्णालयात, पक्षाची सूत्रं मुलाकडे सोपवली – ram vilas paswan reveals he is hospitalised, backs son chirag to take alliance call for bihar polls


नवी दिल्ली : लोक जनशक्ती पक्षाचे नेते (Lok Janshakti Party) आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (Ram Vilas Paswan) यांनी शुक्रवारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याचं सांगितलंय. आपल्या अनुपस्थितीत आपला मुलगा चिराग पासवान याच्याकडे पक्षाची सूत्रं सोपवल्याचंही त्यांनी म्हटलंय. पक्षासंबंधी निर्णय घेण्याचे सर्व अधिकार तसंच एखाद्या पक्षासोबत जाण्याचा किंवा न जाण्यासंबंधी चिराग पासवान जे निर्णय घेतील, ते अंतिम निर्णय असतील, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. काही दिवसांपासून रामविलास पासवान आजारी असल्याच्या काही बातम्या मीडियांतून समोर येत होत्या. मात्र, आपली तब्येत खालावल्याचं लक्षात आल्यानंतर रामविलास पासवान यांनी ही माहिती उघड केलीय. मात्र, आपल्या आजारासंबंधी त्यांनी माहिती दिलेली नाही.


‘करोना संकटकाळात खाद्य मंत्री म्हणून आपली सेवा देण्यसााठी आणि योग्य वेळी खाद्यसामग्री जागेवर पोहचण्यासाठी हरएक प्रयत्न केले. याच दरम्यान तब्येत आणखीन खालावू लागली परंतु, कामात काही अडथळे येऊ नये यासाठी मी रुग्णालयात दाखल होण्याचं टाळलं होतं. परंतु, माझी तब्येत ढासळल्याचं चिरागच्या लक्षात येताच त्याच्या सांगण्यावरून मी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालो आहे’ असं रामविलास पासवान यांनी म्हटलंय.

वाचा :पॅन्गाँग सरोवराजवळ तणावात भर; सीमेवर भारतीय बोर्फार्स तैनात
वाचा :‘बंगाली ब्राह्मण महिला’ रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ काँग्रेस

‘मला आनंद आहे की यावेळी माझा मुलगा चिराग माझ्यासोबत आहे आणि माझी शक्य तेवढी सेवा करत आहे. माझी काळजी घेण्यासोबतच तो पक्षाप्रती असलेली जबाबदारीही योग्य पद्धतीनं पार पाडत आहे. मला विश्वास आहे की आपल्या तरुण विचारांनी चिराग पक्ष आणि बिहारला नव्या उंचीवर घेऊन जाईल. चिरागच्या प्रत्येक निर्णयासोबत मी कणखरपणे उभा आहे. मला आशा आहे की लवकरच बरा होऊन लवकरच आप्तेष्टांजवळ येईल’ असं म्हणत पासवान यांनी आपल्या मुलावर विश्वास व्यक्त केलाय.

आगामी बिहार विधानसभेच्या (Bihar Assembly Elections 2020) पार्श्वभूमीवर रामविलास पासवान यांच्या या ट्विटचे अनेक अर्थ काढले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच पक्षाची एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. जवळपास १४३ जागांवरून आपल्या उमेदवार रिंगणात उतरवण्याची पक्षाची तयारी झालीय. या दरम्यान आता पक्षाच्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयाची जबाबदारी चिराग पासवान यांच्याच खांद्यावर आहे.

वाचा :चिंताजनक उच्चांक! २४ तासांत आढळले ९६,५५१ करोना रुग्ण
वाचा :भारत चीन तणाव : द्विपक्षीय परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत पाच मुद्यांवर सहमतीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *