india news News : अरुणाचलमधून बेपत्ता झालेल्या ५ तरुणांना चीन उद्या भारताच्या ताब्यात देणार: रिजिजू – pla of china will hand over 5 missing people from arunachal pradesh to india tomorrow says union minister kiren rijiju


नवी दिल्ली: चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) अरुणाचल प्रदेशातील बेपत्ता झालेल्या ५ जणांना शनिवारी भारताच्या ताब्यात देणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे पाच जण बेपत्ता झाले होते. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी ही माहिती दिली. (pla of china will hand over 5 missing people from arunachal pradesh to india)

केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने भारतीय सेनेला अरुणाचल प्रदेशातील ५ युवकांना सोपवणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हे पाचजण उद्या १२ सप्टेंबर २०२० ला नियोजित ठिकाणी केव्हाही दाखल होऊ शकतात, असे रिजिजू यांनी ट्विटमध्ये माहिती देताना सांगितले आहे.

या पूर्वी ८ सप्टेंबर या दिवशी देखील रिजिजू यांनी एक ट्विट केले होते. चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने भारतीय लष्कराने पाठवलेल्या हॉटलाइन संदेशाचे उत्तर दिले आहे. अरुणाचल प्रदेशातून बेपत्ता झालेले तरुण त्यांना सापडल्याची माहिती त्यांनी दिली आहे. बेपत्ता झालेल्या लोकांना भारतीय लष्कराच्या ताब्यात देण्याबाबतची प्रक्रियेवर काम सुरू केले जात आहे, अशी माहिती रिजिजब यांनी दिली होती.

गेल्या शनिवारी एका प्रमुख स्थानिक दैनिकात यासंदर्भात एक वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्तात नाचो शहराजवळील एका गावात राहणाऱ्या तागिन समुदायाच्या ५ लोकांचे अपहरण करण्यात आले आहे, अशी माहिती या वृत्तात देण्यात आली होती.

हे कथित अपहरण झाले तेव्हा हे ५ जण जंगलात शिकारीसाठी गेले होतेस असे वृत्तात म्हटले होते. हे वृत्त या तरुणांच्या नातेवाईकांच्या हवाल्याने देण्यात आले होते. या ५ तरुणांचे चीनी सैनिकांनी अपहरण केल्याचा दावा वृत्तात करण्यात आला होता. हा दावा एका सोशल मीडिया पोस्टद्वारे करण्यात आला. ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती.

क्लिक करा आणि वाचा- भारतीय सैन्यदल कोणत्याही स्थितीचा सामना करण्यास तयार: बिपिन रावत

अरुणाचल प्रदेशातील अपर सुबनसिरी जिल्ह्यात असलेले नाचो हे शहर रिजिजू यांच्या मतदारसंघात येते. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिस अधिकऱ्यांचे एक पथक पडताळणीसाठी पाठवण्यात आले. या गावापर्यंत केवळ पायीच जाण्याचा मार्ग आहे. पोलिसांना वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्या आणि सोशल मीडियावर आलेल्या माहितीतूनच यआ प्रकरणाची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर या प्रकरणावर पोलिस मुख्यालयाशी चर्चा केल्यानंतर नाचो पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एक पथक स्थापन करून ते तपासासाठी पाठवण्यात आले.

क्लिक करा आणि वाचा- काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल; गुलामनबी, खरगे यांना महासचिव पदावरून हटवले

क्लिक करा आणि वाचा- जवान आणि अधिकाऱ्यांचे भोजन वेगळे का?; राहुल गांधींचा सवालSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *