coronavirus in maharashtra: Coronavirus In Maharashtra: करोनाचे थैमान सुरूच; महाराष्ट्राने ओलांडला १० लाखांचा टप्पा – total number of covid 19 cases in maharashtra crosses 10 lakh mark


मुंबई: गेल्या सहा महिन्यांपासून करोनाचं संकट झेलत असलेल्या महाराष्ट्रात आजही करोनाचे थैमान कायम आहे. राज्यातील करोना बाधितांच्या संख्येने आज १० लाखांचा टप्पा पार केला असून राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणेसाठी ही फार मोठी धोक्याची घंटा ठरली आहे. राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथील होत असताना रुग्णसंख्येचा झालेला स्फोट झोप उडवणारा ठरला आहे. ( Coronavirus In Maharashtra Latest Updates )

महाराष्ट्रातील करोना रुग्णांची एकूण संख्या गुरुवारी १० लाखांच्या उंबरठ्यावर होती. आज हा आकडा ओलांडून रुग्णसंख्या १० लाख १५ हजार ६८१ इतकी झाली. आतापर्यंत राज्यात घेण्यात आलेल्या एकूण ५० लाख ७२ हजार ५२१ चाचण्यांमधून २० टक्के चाचण्यांचे अहवाल करोनासाठी पॉझिटिव्ह आले आहेत. आज एकाच दिवशी राज्यात तब्बल २४ हजार ८८६ इतक्या नवीन रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *