coronavirus: चिंताजनक उच्चांक! २४ तासांत आढळले ९६,५५१ करोना रुग्ण – corona cases in india all live updates on 11 september 2020


नवी दिल्ली : देशात करोनाची परिस्थिती चिंताजनक असल्याचं आकलन समोर दिसणाऱ्या आकड्यांवरून करता येऊ शकेल. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, गुरुवारी देशात रेकॉर्डब्रेक ९६ हजार ५५१ रुग्णांची भर पडलीय तर एकाच दिवशी तब्बल १२०९ जणांनी करोनामुळे आपले प्राण गमावलेत. याचसोबत देशातील एकूण रुग्णांची संख्या ४५ लाख ६२ हजार ४१५ वर पोहचलीय

एकूण रुग्णांच्या संख्येपैंकी ९ लाख ४३ हजार ४८० जणांवर उपचार सुरू आहेत. भारतात आत्तापर्यंत ३५ लाख ४२ हजार ६६४ रुग्णांनी करोनावर मात केलीय तर भारतात करोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ७६ हजार २७१ वर पोहचलीय

महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या पाच राज्यांमुळे देशाच्या चिंतेत भर पडलीय. महाराष्ट्रात दररोज रुग्णांच्या संख्येत रेकॉर्डब्रेक भर पडताना दिसतेय. रुग्णसंख्येत क्रमांक १ वर असलेल्या महाराष्ट्रानं अद्याप आपलं यादीतलं स्थान कायम राखलंय. महाराष्ट्रात सध्या २ लाख ५३ हजार १०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर २७ हजार ७८७ जणांचा मृत्यू झालाय. दिलासादायक म्हणजे तब्बल ६ लाख ८६ हजार ४६२ रुग्णांनी करोनावर मात केलीय.

संबंधित बातम्या :
वाचा :ड्रग कंट्रोलरच्या नोटीसनंतर सीरम इन्स्टिट्यूटने देशात करोना लसीची चाचणी थांबवली
वाचा :‘ही’ आहे करोना लशीची भारतातील स्थिती; आरोग्य मंत्रालयाने केले स्पष्ट
वाचा :‘मोदी सरकारनं देशातील तरुणांचं भविष्य पायदळी तुडवलं’

राज्यानुसार आकडेवारी

राज्य उपचार सुरू बरे झालेले रुग्ण मृत्यू
१. अंदमान निकोबार २९३ ३१२१ ५१
२. आंध्र प्रदेश ९७३३८ ४३५६४७ ४७०२
३. अरुणाचल प्रदेश १६५८ ४००५
४. आसाम २९६९० १०५७०१ ४१४
५. बिहार १५२३९ १३७५४४ ७८५
६. चंडीगड २५७३ ४३३१ ८३
७. छत्तीसगड २६९१५ २२७९२ ४०७
८. दादरा-नगर हवेली/दमन-दीव २९५ २३४६
९. दिल्ली २३७७३ १७२७६३ ४६३८
१०. गोवा ४८३३ १७१५६ २६२
११. गुजरात १६२९६ ८८६८८ ३१४९
१२. हरियाणा १७३२८ ६५१४३ ८८२
१३. हिमाचल प्रदेश २४८७ ५५९७ ६७
१४. जम्मू-काश्मीर १२८३९ ३३८७१ ८३२
१५. झारखंड १५७२६ ४०६५९ ५१२
१६. कर्नाटक ९९४८९ ३१५४३३ ६८०८
१७. केरळ २४६१६ ७०९१७ ३८४
१८. लडाख ७७८ २३२९ ३५
१९. मध्य प्रदेश १७७०२ ५९८५० १६४०
२०. महाराष्ट्र २५३१०० ६८६४६२ २७७८७
२१. मणिपूर १७७४ ५५४८ ४०
२२. मेघालय १३५५ १८२३ १९
२३. मिझोरम ४२२ ७५०
२४. नागालँड ५७८ ३७८७ १०
२५. ओडिशा २९२५५ १०५२९५ ५८०
२६. पुदुच्चेरी ४७७० १२९६७ ३४७
२७. पंजाब १७०६५ ५०५५८ २०६१
२८. राजस्थान १५१०८ ७९४५० ११७८
२९. सिक्कीम ५५३ १४२९
३०. तामिळनाडू ४९२०३ ४२३२३१ ८०९०
३१. तेलंगणा ३२१०६ ११७१४३ ९२७
३२. त्रिपुरा ७०८६ ९९९३ १७३
३३. उत्तराखंड ८५७७ १८२६२ ३७२
३४. उत्तर प्रदेश ६४०२८ २१६९०१ ४११२
३५. पश्चिम बंगाल २३३४१ १६२९९२ ३७३०
एकूण ९१९०१८ ३४७१७८३ ७५०६२

इतर बातम्या :
वाचा :भारत चीन तणाव : द्विपक्षीय परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत पाच मुद्यांवर सहमती
वाचा :मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्पावर PM मोदी-शिंजो आबेंमध्ये चर्चा
वाचा :लडाख तणाव; चिन्यांना झटका देत सर्वाधिक उंचीवर भारतीय लष्कराचा ताबाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *