BJP president: बंगालचे सरकार हिंदूविरोधी; भाजप अध्यक्ष नड्डांचा आरोप – the government of bengal is anti-hindu says bjp president j. p. nadda


वृत्तसंस्था, कोलकाता

पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे सरकार हे हिंदूविरोधी असून अल्पसंख्यांचा अनुनय करणारे आहे, या शब्दांत भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी तृणमूल सरकारवर टीकास्त्र सोडले.

राज्यात तृणमूल काँग्रेस भ्रष्ट कारभार करत असून तृणमूलचा पाठिंबा असलेल्या भूमाफियांनी शांतिनिकेतनमधील विश्वभारती विद्यापीठात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा वारसाही धुळीस मिळवला आहे, असा हल्लाबोल नड्डा यांनी केला.

भाजपच्या नवनियुक्त राज्य कार्यकारिणीला डिजिटल माध्यमांतून संबोधित करताना, नड्डा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले. ‘जेव्हा संपूर्ण देश अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पाहत होता, तेव्हा स्थानिक पातळीवर जनतेला यात सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी ५ ऑगस्ट रोजी राज्यात लॉकडाउन लागू केला. बकरी ईदसाठी लॉकडाउन हटवण्यात आला,’ असे नड्डा म्हणाले. राज्यात १०० हून अधिक भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्याचा दावा करत, यानंतरही लोकशाहीचे कैवारी गप्प का आहेत, असा प्रश्न त्यांनी केला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *