Bajaj Finance waive bouce charges on auto loan: ‘मनसे’चा बजाज फायनान्सला दणका ; कर्जदार रिक्षा मालकांना मिळाला दिलासा – bajaj finance waives emi bounce charges for auto loan


मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्यामुळे बजाज फायनान्सला कर्जदार रिक्षा मालकांना दिलासा मिळाला आहे. बजाज आटो फायनान्सच्या मुंबई आणि ठाण्यातील रिक्षा मालकांना सप्टेंबर २०२०च्या महिन्यासाठी आकारण्यात येणारे धनादेश- ईसीएस अनादरित झालेले शुल्क (बाऊन्स चार्जेस) माफ करण्यात येणार आहेत.

समिती स्थापन; हे तीन तज्ज्ञ सोडवणार ‘EMI Moratorium’चा पेच
फेब्रुवारी २०२०पर्यंत थकबाकी न ठेवता, ज्या कर्जदारांनी ‘ईएमआय मोरॅटोरिअम’चा लाभ घेतलेला आहे अशांना महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या आग्रहावरुन बजाज फायनान्सने ही सवलत दिली आहे. या योजनेनुसार राज्यातील १,१९,७४३ रिक्षा मालकांची सरासरी ४००० रुपयांची बचत होईल, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने केला आहे. बजाज फायनान्सला यामुळे ४७ कोटींवर पाणी सोडावे लागणार आहे.

कर्ज घेताय ; ‘या’ बँकेचा निर्णय तुमची करेल बचत!
टाळेबंदीच्या कठोर अंमलबजावणीमुळे राज्यातील रिक्षा मालकांचे पाच महिने उत्पन्न बुडाले. मात्र रिक्षासाठी घेतलेल्या कर्जाचे मासिक हप्ते भरण्यासाठी बजाज फायनान्सचा तगादा सुरु होता. अशा अनेक तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेकडे आल्यानंतर गोरेगाव येथील बजाज फायनान्सच्या कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने धडक देऊन कंपनीला इशारा दिला होता. अखेर कंपनी प्रशासनाने याची दखल घेतली आणि कर्जदार रिक्षा मालकांकडून कर्जावरील बाऊन्स चार्जेस आणि इतर थकीत शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला.

कमॉडिटी बाजारात नफावसुली ; सोने-चांदीचे भाव गडगडले
बजाज फायनान्सचे वरिष्ठ अधिकारी आणि मनेसेचे संजय नाईक, कीर्तिकुमार शिंदे यांच्यात बैठक झाली. यात मनसेने सुचवलेली योजना बजाज फायनान्सने मान्य केली. त्यानुसार मार्च २०२० ते आॅगस्ट २०२० या कालावधीत आकारण्यात आलेले धनादेश ईसीएस अनादरीत झालेले शुल्क (बाऊन्स चार्जेस) आणि इतर थकीत शुल्क (अदर ओव्हरड्यू चार्जेस) यांच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम ३० सप्टेंबर २०२० रोजी किंवा त्यापूर्वी माफ केले जाईल.ग्राहकाने सप्टेंबर २०२०, आक्टोबर २०२० आणि नोव्हेंबर २०२० या महिन्यात कर्जाच्या हप्त्याच्या तारखेला किंवा त्याआधी ईएमआय भरणा केल्यास उर्वरित थकीत शुल्काची ५० टक्के रक्कम माफ केली जाणार आहे, असे कंपनीने म्हटलं आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *