ahmednagar news News : Rajesh Tope: महाराष्ट्रात ऑक्सिजनचा तुटवडा?; आरोग्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती – there will be no shortage of oxygen in maharashtra says health minister rajesh tope


अहमदनगर : ‘महाराष्ट्रात जे काही ऑक्सिजन उत्पादित करणारे प्लांट आहेत, त्या सर्वांच्या बाबतीत आम्ही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी उत्पादन होणाऱ्या ऑक्सिजनपैकी ८० टक्के ऑक्सिजनचा पुरवठा हा अन्य उद्योगांना होत होता, तर करोना साथ येण्याआधी केवळ २० टक्केच ऑक्सिजनचा पुरवठा मेडिकलसाठी केला जात होता. आता मात्र त्यात बदल करण्यात आला आहे. एकूण ऑक्सिजन उत्पादनाच्या ८० टक्के पुरवठा आता मेडिकलसाठी व २० टक्के पुरवठा उद्योगांसाठी करावा, असे निश्चित करण्यात आले आहे. हे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात करोना बाधित व अन्य रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही. ऑक्सिजनचा पुरवठा शंभर टक्के पुरेल,’ अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ( Rajesh Tope on Shortage of Oxygen in Maharashtra )

वाचा: डॉक्टर म्हणाले, करोना असू शकतो; वृद्धाने केली आत्महत्या

जालना येथे जात असताना टोपे हे काही वेळ नगरच्या शासकीय विश्रामगृहावर थांबले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘ऑक्सिजनचे उत्पादन होणारी जी ठिकाणे आहेत, तेथून प्रत्येक जिल्ह्यात व्यवस्थित ऑक्सिजन पोहोच व्हावा, यासाठी एक ‘वॉर रूम’ तयार केली आहे. या ‘वॉर रुम’ साठी अन्न व औषध प्रशासन, आरोग्य विभाग व आरटीओ विभाग येथील अधिकारी नियुक्त केले आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील मागणी व होणार पुरवठा यांचे निरिक्षण येथून केले जात असून त्याद्वारे व्यवस्थित पुरवठा केला जात आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात जेथे ऑक्सिजन प्लांट आहेत, त्याठिकाणी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्याला केवळ संबंधित प्लांटमधून ऑक्सिजन उद्योगांना न जाता कुठल्याही परिस्थितीत हॉस्पिटलला गेला पाहिजे, त्यादृष्टीने बारकाईने लक्ष देण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा येण्याचे कारण नाही,’ असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

वाचा: पुण्यात ऑक्सिजनचा तुटवडा, आता खूप झालं…!; अधिकाऱ्यांवर भडकले अजितदादा

अजिबात अडचण राहणार नाही

‘ऑक्सिजन उत्पादन संबंधी पुण्याला अंत्यत मोठा प्लांट हा आठ दिवसांच्या आतमध्ये उत्पादनाला सुरुवात करेल. तो जेव्हा सुरू होईल, तेव्हा खूप मोठ्या पद्धतीने उत्पादनाचे काम होऊ शकेल व अजिबात अडचण राहणार नाही. तूर्त ऑक्सिजनची कोणतीही अडचण नाही. आपण ऑक्सिजनची सगळी स्थिती स्थिर करीत आहोत,’ अशीही माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

वाचा: १०३ वर्षांच्या आजीची करोनावर मात; वाढदिवस दणक्यात साजरा!Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *