Uttar Pradesh crime: भाजप नेता तरुणीचा करत होता पाठलाग; चपलेनं मारलं, व्हिडिओ व्हायरल – uttar pradesh crime kanpur bjp leader beaten with sandal by women video goes viral


सुमित शर्मा / कानपूर: उत्तर प्रदेशातील कानपूरच्या एका भाजप नेत्याला तरुणीचा पाठलाग करणं महागात पडलं आहे. हा भाजप नेता महिनाभरापासून तिचा पाठलाग करत होता. याबाबत तरुणीने कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांनी मनीष पांडेय या नेत्याला बेदम चोप दिला. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. पांडेय हा गोविंदनगर विधानसभा मतदारसंघातील कल्याणपूरमधील भाजपचा विभाग अध्यक्ष असल्याचे सांगितले जाते.

कुटुंबीयांच्या माहितीनुसार, पांडेय हा महिनाभरापासून तरुणीचा पाठलाग करत होता. बुधवारी तरुणीने आपल्या कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर त्यांनी पांडेय याला चप्पल आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तरुणीने त्याला चपलेने मारहाण केली. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. मनीष पांडेय हा रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या तरुणींची छेड काढत असे. तसेच तो मैत्रीचा प्रस्ताव ठेवत असे, असा आरोप आहे.

तरुणीने त्याला भेटण्यासाठी बोलावलं अन्…

तरुणीच्या कुटुंबीयांनी त्याला रंगेहाथ पकडण्याचा प्लान केला होता. त्यानुसार, तरुणीने त्याला भेटण्यासाठी बोलावले. मनीष त्याठिकाणी पोहोचला असता, कुटुंबीयांनी त्याला पकडले आणि चप्पल, लाथाबुक्क्यांनी चोप देण्यास सुरुवात केली. त्यानंतर नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

व्हिडिओ व्हायरल

भाजपच्या या नेत्याला झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मनीष दुचाकीवर बसलेला आहे. त्याने हिरव्या रंगाचा कुर्ता आणि जीन्स घातलेली आहे. तरुणीच्या कुटुंबीयांनी त्याच्या दुचाकीला धक्का दिला आणि त्याला खाली पाडले. त्यानंतर त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. दोन महिलांनी त्याला चपलेने मारल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

आणखी बातम्या वाचा:

पत्नीची हत्या करून ‘तो’ पोहोचला थेट पोलीस ठाण्यात

मॉब लिंचिंग; चोर समजून जमावाने मरेपर्यंत मारले, तरुणाचा रुग्णालयात मृत्यू

संतापजनक! जन्मदात्या बापाकडूनच मुलीवर बलात्कार; ६ वर्षे शोषण

बोगस कोविड टेस्ट रिपोर्ट दिले जात होते, ‘असा’ झाला भंडाफोड

माहेरी आलेल्या नवविवाहित महिलेवर सामूहिक बलात्कारSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *