Shibani Dandekar Slams Ankita Lokhande – अंकिता लोखंडेवर भडकली शिबानी दांडेकर, आठवून दिला ब्रेकअपचा काळ


मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर, एकीकडे अंकिता लोखंडेने अभिनेत्याच्या कुटुंबाची साथ दिली. राजपूत कुटुंबाच्या प्रत्येक निर्णयात ती खंबीरपणे त्यांच्यासोबत उभी राहिली आहे. तर दुसरीकडे आता बॉलिवूडमधील अनेक कलाकार रिया चक्रवर्तीच्या समर्थनात उभे राहताना दिसत आहेत. यापैकी एक नाव म्हणजे फरहान अख्तरची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर. शिबानीने काही दिवसांपूर्वी रियाला उघडपणे पाठिंबा दिला होता. आता शिबानीने सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला लक्ष्य केलं आहे. शिबानीने अंकिताच्या नव्या इन्स्टाग्राम पोस्टला प्रतिक्रिया दिली आहे.

स्वतंत्र सेल.. बाजूला इंद्राणी मुखर्जीची बराक, भायखळा तुरुंगात अशी गेली रियाची पहिली रात्र

अंकिताने सुशांतला ड्रग्ज दिल्याबद्दल विचारलेला प्रश्न

मंगळवारी एनसीबीने रिया चक्रवर्तीला अटक केली. यानंतर अंकिताने इन्स्टावर एक पोस्ट शेअर केली. त्यात लिहिले की, योगायोगाने काहीही घडत नसतं. आपण आपल्या कृतीतून स्वतःचं भविष्य घडवत असतो. हे कर्म आहे. यानंतर अंकिताने ट्विटरवरूनही रियासाठीचे काही प्रश्न उपस्थित केले. अंकिताने विचारलं की, नैराश्यात असलेल्या माणसाला ड्रग्ज घ्यायची परवानगी द्यावी का? एकीकडे त्या व्यक्तीवर प्रचंड प्रेम आहे असं म्हणायचं आणि दुसरीकडे त्याला ड्रग्जही आणून द्यायचे.. त्यातही जेव्हा तुम्हाला माहीत आहे की त्याची मानसिक स्थिती चांगली नाही. शिबानीने अंकिताच्या याच पोस्टवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.


दोन सेकंदांच्या प्रसिद्धीसाठी अंकिताचा तमाशा

अंकितासाठी शिबानीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटलं की, ‘ही बाई दोन सेकंदाच्या प्रसिद्धीच्या शोधात आहे. याचसाठी ती रियाला जाणीवपूर्वक लक्ष्य करत आहे. ती स्वतः सुशांतसोबतच्या नात्यात आलेल्या अडचणींना तोंड देऊ शकली नव्हती. तिला असं करण्यास सांगितलं जात आहे.’

PCOS मुळे वेदनेने विव्हळत आहे अभिनेत्री, करावी लागणार तातडीने सर्जरी

अंकिता म्हणाली – माझ्यासाठी ‘सौतन’ आणि ‘विधवा’ सारख्या शब्दांचा वापर केला गेला

शिबानीने या सर्व गोष्टी अंकिता लोखंडेच्या ट्वीटला री-ट्वीट करत म्हटली. अंकिताने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘मीडियाने वारंवार मला विचारलं की ही हत्या आहे की आत्महत्या… मी कधीच असं म्हटलं नाही की ही हत्या आहे किंवा यासाठी कोणतीही विशेष व्यक्ती जबाबदार आहे. मी नेहमीच माझा दिवंगत मित्र सुशांतसिंग राजपूत याच्यासाठीच्या न्यायाबद्दल बोलले आहे आणि मी त्याच्या कुटूंबासोबत उभी आहे.’

कंगनाच्या समर्थनात रेणुका शहाणे, म्हणाल्या ‘इतकं खाली येण्याची गरज नव्हती’


‘तपास यंत्रणांनी सत्य समोर आणलं पाहिजे हीच माझी इच्छा आहे. एक महाराष्ट्रीयन आणि भारतीय नागरिक असल्याने मला राज्य सरकार / पोलीस आणि केंद्र सरकारवर पूर्ण विश्वास आहे. जेव्हा माझ्यासाठी ‘सौतन’ आणि ‘विधवा’ असे शब्द वापरले गेले तेव्हाही मी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. २०१६ पर्यंत सुशांत आणि त्याचं मानसिक आरोग्य कसं होतं हे सांगण्यासाठीच पुढे आले.’

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *