Saurabh Rao: Saurabh Rao: करोना बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध; ३६०० पथके फिल्डवर! – covid 19 updates 3600 squads for contact tracing in pune district


पुणे:करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्याची मोहीम अधिक व्यापक केली जाणार असून, तपासणी पथके वाढविण्यात येणार आहेत. सध्या पुणे महापालिकेच्या क्षेत्रात बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे प्रमाण सुमारे ११.२० टक्के आहे तर, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत दहा टक्के आहे. ( Divisional commissioner Saurabh Rao On Coronavirus in Pune )

वाचा: करोना: पुण्यात बेड पडणार अपुरे; ‘ही’ धडक मोहीम घेणार हाती

करोना बाधित रुग्णांवर उपचार करण्याबरोबरच बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची चाचणी आणि विलगीकरण करण्याच्या कामावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे बाधित रुग्ण हे वेळीच सापडून संसर्गाचे प्रमाण कमी होऊ शकणार आहे. याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, ‘सध्या बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे प्रमाण वाढविण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी पथकांची संख्या वाढविण्यात येणार आहे’

वाचा: महाराष्ट्रात करोनाबळींचा उच्चांक; आज ४४८ मृत्यूंची नोंद, २३४४६ नवे बाधित

‘बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा वेळीच शोध घेतला गेल्यास संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होणार आहे. संबंधित नागरिकांची चाचणी करणे, विलगीकरण करणे या गोष्टी वेळेवर झाल्यास संसर्ग वाढणार नाही. त्यामुळे ही माहीम व्यापक केली जाणार आहे’ असे राव यांनी स्पष्ट केले. ‘सध्या हे काम सुरू असून, पुणे महापालिकेच्या हद्दीत बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे प्रमाण हे ११.२० टक्के आहे. सर्वांत कमी प्रमाण हे पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या हद्दीत आहे. या महापालिकेच्या क्षेत्रात हे प्रमाण दहा टक्के आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हे प्रमाण सर्वाधिक १३ टक्के आहे. हे प्रमाण आणखी वाढविण्यात येणार आहे’ असे राव यांनी सांगितले.

वाचा: १०३ वर्षांच्या आजीची करोनावर मात; वाढदिवस दणक्यात साजरा!

‘करोनाची साखळी तोडण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याबरोबरच बाधितांच्या संपर्कातील व्यक्ती शोधणे हे अत्यावश्यक झाले आहे. सध्या चाचण्यांचे प्रमाण हे देशात सर्वाधिक आहे. चाचण्या घेण्याचे काम सुरू राहणार आहे’ असे राव म्हणाले.

३६०० पथके कार्यरत

ज्येष्ठ नागरिक आणि व्याधिग्रस्त नागरिकांचे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. ३६०० पथकांकडून हे काम करण्यात येत आहे. या पथकांमुळे ज्येष्ठ नागरिक आणि व्याधीग्रस्त १७२४ नागरिक हे करोनाबाधित असल्याचे शोधण्यात यश आले आहे. पुण्यात ५४०, पिंपरी चिंचवडमध्ये ४२२ आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २६३८ पथकांकडून हे काम करण्यात येत आहे’ अशी माहिती राव यांनी दिली.

वाचा: दशक्रिया विधी करणार नाही!; पुरोहितांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णयSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *