Sambhaji Bidi to be Rename: शिवप्रेमींचा मोठा विजय! संभाजी बिडीचं नाव बदलणार; कंपनीनं पत्रकच काढलं – sambhaji bidi to be disappeared, company decided to change product name


पुणे: गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या व मागील काही दिवसांपासून शिवप्रेमींनी पुन्हा ऐरणीवर आणलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या अपमानाचा एक विषय कायमचा निकाली निघणार आहे. पुण्यातील साबळे वाघिरे आणि कंपनीनं ‘संभाजी बिडी‘ या आपल्या उत्पादनाचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. तसं पत्रक कंपनीनं प्रसिद्धिस दिलं आहे.

महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या संभाजी महाराजांचं नाव एका विडीला देण्यावरून शिवप्रेमींच्या भावना तीव्र होत्या. यापूर्वीही याबाबतच्या चर्चेला अनेकदा तोंड फुटलं होतं. मात्र, यावेळी संभाजी ब्रिगेडसह काही संघटनांनी हा विषय लावून धरला होता. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी आंदोलनही सुरू केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही सोशल मीडियातून विषयी आवाज उठवला होता. लोकभावनेचा आदर करून कंपनीनं याबाबत ताबडतोब निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली होती. त्यांना भाजपचे आमदार नीतेश राणे यांचीही साथ मिळाली होती. नीतेश यांनी थेट ‘धूर काढण्याची’ भाषा केली होती. या सगळ्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.

वाचा: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना करोना; झाल्या होम क्वारंटाइन

साबळे वाघिरे आणि कंपनीनं आपल्या उत्पादनाचं नाव बदलण्याचं निश्चित केलं आहे. सर्व संघटनांच्या व जनतेच्या भावनांचा आदर करून आम्ही हा निर्णय घेतला आहे. मात्र, याबाबतची सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यास काही दिवस लागतील याची नोंद संबंधितांनी घ्यावी, असं आवाहनही कंपनीनं केलं आहे. ‘विडी व्यवसाय हा आमचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. संभाजी महाराजांच्या आदरापोटीच आमच्या वडिलांनी या उत्पादनला त्यांचे नाव दिले होते. त्यामागे अवमान करण्याचा कुठलाही हेतू नव्हता. २०११ मध्ये संभाजी ब्रिगेडच्या मागणीनुसार आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो व छत्रपती हा शब्द पॅकेटवरून हटवला होता. आताही आमची भूमिका सकारात्मक आहे. आमच्या व्यवसायावर ६० ते ७० हजार कामगारांचा प्रंपच सुरू आहे. यात प्रामुख्यानं महिलांचा समावेश आहे. आम्ही तडकाफडकी नाव बदलले तर आमच्या व्यवसायाची साखळी तुटेल. हा व्यवसाय बंद पडला तर हजारो कुटुंबांवर त्याचा परिणाम होईल. त्यामुळं सर्वांनी सहकार्य करावे, अशी विनंती कंपनीच्या प्रमुखांनी केली आहे.

हा तर महाराष्ट्राबरोबर श्रीरामाचाही अपमान: काँग्रेसSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *