Rajnath Singh Warns China – दु:साहसाचं प्रत्यूत्तर मिळणार, राजनाथ सिंहांचा चीनला इशारा


अंबाला : अंबाला हवाई तळावर पाच राफेल लढावू विमानं भारतीय वायुसेनेत औपचारिकरित्या सामील झाले. यावेळी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनलाही इशारा दिलाय. सीमेवर ज्या पद्धतीचं वातावरण तयार झालंय किंवा तयार करण्यात आलंय ते पाहता राफेल हवाई दलात सामील होणं महत्त्वाचं आहे. राफेल गेम चेंजर आणि मल्टी रोल कॅपॅसिटीसोबत शत्रुला धडा शिकवण्यासाठी सक्षम असल्याचंही राजनाथ सिंह यांनी यावेळी म्हटलंय.


‘भारतानं नेहमीच वसुधैव कुटुंबकम म्हटलंय परंतु, सीमेवर कोणत्याही पद्धतीच्या दु:साहसाचं प्रत्यूत्तर देण्यासाठीही भारत तयार आहे. राफेलचा वायुदलातील सहभागी सीमा सुरक्षा आणि क्षेत्रीय अखंडता कायम राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे’ असं राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात म्हटलं.

संबंधित बातम्या :
वाचा :Video : ‘वॉटर कॅनन सॅल्युट’नं राफेलचं शानदार स्वागत
वाचा :चीनला दिसणार राफेलची ताकद, अंबालामधील उद्याच्या मेगा शोमध्ये होणार गर्जना
वाचा :… म्हणून वेळेअगोदरच राफेलच्या मध्यरात्री हिमालयात घिरट्या

वायुसेनेनं आपण कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलंय. फॉरवर्ड सीमेवर तत्काळ विमानं तैनात करून शत्रुला स्पष्ट संदेश देण्यात आलाय. त्यामुळे आता कोणत्याही पद्धतीच्या हालचाली करण्यापूर्वी शत्रू अनेकदा विचार करेल, असं म्हणत त्यांनी वायुदलाचं कौतुक केलं.

या कार्यक्रमासाठी फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली यादेखील उपस्थित होत्या. राफेलचा भारतीय वायुदलातील समावेश भारत आणि फ्रान्स दरम्यान असलेल्या दृढ संबंध दर्शवतो. भारत आणि फ्रान्स प्रदीर्घ काळापासून आर्थिक, सांस्कृतिक आणि राजनैतिकरित्या जोडला गेलाय. मजबूत लोकशाहीवर असलेला दृढ विश्वास आणि संपूर्ण जगात शांतीची आशा आमच्या आपांपासांतील संबंधांचा दुवा आहे, असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं. भारतीय वायुदलाच्या १७ स्क्वॉड्रन ‘गोल्डन अॅरो’च्या हातात राफेलचा वापर आणि देखभालाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.

इतर बातम्या :
वाचा :पूर्व लडाखमध्ये २०० मीटरवर भारत-चिनी सैनिक लष्कर आमनेसामने
वाचा :कुठल्याही स्थितीत चिन्यांना सीमेत घुसू देऊ नका, भारतीय लष्कराचे कमांडर्सना आदेश
वाचा :पँगाँग सरोवर परिसरात तणाव कायम; चिनी सैनिकांची वाढती संख्याSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *