Rajnath Singh: ‘भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना राफेल एक कडक संदेश’ – rafale induction defence minister rajnath singh ladakh face off


अंबाला: पूर्व लडाखमध्ये भारत-चीनमध्ये सीमेवर असलेल्या तणावाच्या परिस्थितीवरून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीनला इशारा दिला. भारताच्या सार्वभौमत्वाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या राफेल हा एक कडक संदेश आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले. भारतीय हवाई दलात ५ राफेल विमानांचा समावेश होणं हा भारताच्या सार्वभौमत्वाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांसाठी एक ‘मोठा आणि कडक’ संदेश आहे, असं राजनाथ सिंह यांनी नाव घेता चीनला इशारा दिला. अंबाला हवाई दलाच्या तळावर झालेल्या गुरुवारी शानदार सोहळ्यात ५ राफेल लढाऊ विमानं भारतीय हवाई दलात औपचारिकपणे दाखल करण्यात आली.

पूर्व लद्दाखमध्ये चीनसोबत सीमेवर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राफेल विमानामुळे भारताची ताकद वाढली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली, सीडीएस जनरल बिपीन रावत आणि हवाई दल प्रमुख आर के एस भदौरिया यांच्यासह इतर अनेक अधिकारी या समारंभाला उपस्थित होते. सर्व विमानं पूजेनंतर भारतीय हवाई दलात दाखल करण्यात आले. त्याचा व्हिडिओ संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शेअर केला आहे.

राफेल विमानांचा हवाई दलात समावेश होणं हे संपूर्ण जगाला, विशेषत: भारताच्या सार्वभौमत्वाकडे वाकडी नजर आहे त्यांना त्यांच्यासाठी एक कडक संदेश आहे. भारतीय सीमेच्या सभोवतालची स्थिती लक्षात घेता भारतीय हवाई दलात राफेल विमानं दाखल महत्त्वाचं आहे. राष्ट्रीय सुरक्षेला भारताचे प्राधान्य आहे आणि आपला भूमीचे संरक्षणर करण्यासाठी दृढ आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात होणाऱ्या बैठकीच्या काही तासापूर्वी राजनाथ सिंहांनी हा इशारा दिला आहे. भारताची जबाबदारी केवळ आपल्या प्रादेशिक सीमेपुरती मर्यादित नाही. तर हिंद-प्रशांत आणि हिंद महासागराच्या क्षेत्रात शांतता आणि सुरक्षेसाठीही भारत कटिबद्ध आहे, असं राजनाथ सिंहांनी स्पष्ट केलं. या दोन्ही क्षेत्रांमध्ये चीन आपले सैन्य वाढवत आहे. पूर्व लडाखमधील वाढत्या तणावावरही राजनाथ सिंहांनी बोट ठेवलं. गेल्या काही दिवसांत सीमेवर निर्माण होत असलेल्या तणावाच्या स्थितीमुळे रफेल भारतासाठी फार महत्वाचं आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले.

ड्रग कंट्रोलरच्या नोटीसनंतर सीरम इन्स्टिट्यूटने देशात करोना लसीची चाचणी थांबवली

एलएसी जवळच्या ‘अलिकडील दुर्दैवी घटने’ दरम्यान तातडीने कारवाई केल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलाचं कौतुक केलं. हवाई दलाने ज्या गतीनं आघाडीच्या चौक्यांवर शस्त्रास्त्र तैनात केली त्याने आत्मविश्वास वाढला, असं ते म्हणाले. ‘सीमेवर वाढत असलेल्या तणावाच्या परिस्थितीकडे आपलं लक्ष वेधलं गेलं आहे. पण आपल्याला दहशतवादाच्या धोक्याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही, असं राजनाथ सिंहांनी सांगितलं.

राफेलमुळे संपूर्ण क्षेत्रात भारताचा दबदबा असेलः फ्रान्सच्या संरक्षण मंत्री

सध्याची सुरक्षेची स्थिती पाहता रफेल विमानांना भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात समावेश करण्याती हीच योग्य वेळ आहे, असं हवाई दल प्रमुख भदौरिया म्हणाले. भारतीय हवाई दलात राफेल विमानांचा समावेश हा ऐतिहासिक क्षण आहे. आणि यातून भारत आणि फ्रान्समधील ‘दृढ संबंध’ देखील दिसून येतात, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *