Rajasthan Crime: लज्जास्पद! वहिनीचे आंघोळ करताना काढले फोटो; केलं लैंगिक शोषण – rajasthan crime jodhpur woman blackmailed and sexually abused after photo taken while bathing her


जोधपूर: राजस्थानमधील जोधपूरमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेचे नात्याने दीर असलेल्या व्यक्तीने आंघोळ करताना फोटो काढले. तिला ब्लॅकमेल करून तिचे तीन वर्षे लैंगिक शोषण केले. महिलेने विरोध केला असता, तिच्यासोबतचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. या प्रकरणी पीडितेने प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पीडितेची बुधवारी वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे.

प्रतापनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. एक दिवस घरी एकटीच होती. बाथरूममध्ये आंघोळ करत असताना दीर अशोक (नाव बदललेले आहे) फोटो काढले. त्यानंतर ते फोटो दाखवून ब्लॅकमेल केले. आरोपीने काही दिवसांनी घरात एकटी असताना काही गोळ्या खायला दिल्या. बेशुद्ध झाल्यानंतर त्याने लैंगिक अत्याचार केले आणि त्याचा व्हिडिओ तयार केला.

व्हिडिओ शूट केल्यानंतर त्याने महिलेवर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. विरोध केला असता, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी अखेर पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार दाखल करून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *