rafale induction in iaf: राफेलमुळे संपूर्ण क्षेत्रात भारताचा दबदबा असेलः फ्रान्सच्या संरक्षण मंत्री – rafale induction in iaf french minister florence parly statement


अंबाला: राफेल लडाऊ विमानांमुळे भारताच्या सुरक्षेला धार येईल, असं फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनी गुरुवारी सांगितलं. राफेल लढाऊ विमानांचा गुरुवारी भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात समावेश झाला. भारतीय हवाई दलात ५ राफेल लढाऊ विमानांचा समावेश करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात पार्ली बोलत होत्या. भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश संरक्षण संबंधात एक नवीन अध्याय लिहित आहेत. भारताला ३६ राफेल विमानांना पुरवठा करण्याच्या या योजनेचे अनेक अर्थ आहेत, असं पार्ली म्हणाल्या.

‘सैन्याच्या दृष्टीने पाहता भारत जागतिक स्तरावरील क्षमता साध्य करेल, असा याचा अर्थ आहे. भारत खरोखरच जगातील सर्वाधिक शक्तिशाली देशांपैकी एक असेल आणि हवाई दलाला अविश्वसनीय असे शस्त्र मिळेल’, असं पार्ली म्हणाल्या. सामरिक संदर्भातून बघितल्यास भारताला आपली आणि आपल्या जनतेचे रक्षण करण्यासाठी संपूर्ण क्षेत्रात धार मिळेल, असं पार्ली यांनी स्पष्ट केलं.

अंबाला तळावर आयोजित कार्यक्रमात ५ राफेल विमानं भारतीय हवाई दलात दाखल झाली. ‘राफेल’ म्हणजे ‘वादळ’ किंवा ‘आगीचा लोळ’. या ‘दोघांचा अर्थ अविश्वसनीय क्षमता व्यक्त करणारा आहे. हे दोन्ही देशांमधील दृढ संबंधांचेही प्रतीक आहे. भारताच्या ‘मेक इन इंडिया’ योजनेला फ्रान्सचा पाठिंबा असल्याचंही त्यांनी पार्ली यांनी सांगितलं.

पूर्व लडाखमध्ये २०० मीटरवर भारत-चिनी सैनिक लष्कर आमनेसामने

‘मेक इन इंडिया उपक्रमासह भारतीय उत्पादकांना आमच्या जागतिक पुरवठा साखळीत आणखी एकीकृत करण्यासाठी आम्ही पूर्ण वचनबद्ध आहोत. ‘मेक इन इंडिया’ हे बर्‍याच वर्षांपासून फ्रान्सच्या उद्योगांसाठी महत्त्वाचे होते. विशेषत: पाणबुडीसारख्या संरक्षण उपकरणांमध्ये. आता अनेक फ्रेंच कंपन्या आणि त्यांची डिझाइन कार्यालये भारतात स्थापन करण्यात आली आहेत. आता आशा आहे की इतरही कंपन्या आपले समर्थन आणि सेवा देण्यासाठी येतील, असं पार्ली म्हणाल्या.

ड्रग कंट्रोलरच्या नोटीसनंतर सीरम इन्स्टिट्यूटने देशात करोना लसीची चाचणी थांबवली

भारतीय हवाई दलाच्या १७ व्या स्क्वॉड्रनमध्ये राफेल विमानांचा समावेश करण्यात आला. एका सोहळा पारंपरिक सोहळ्यात ‘सर्वधर्म पूजा’ पार पडल्यानंतर त्यांचा औपचारिकरित्या समावेश झाला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *