rafale: ‘सर्वधर्म पूजे’नंतर वायुदलाच्या ताफ्यात सामील होणार ‘राफेल’ – five rafale to be inducted into indian air force today at ambala airbase


नवी दिल्ली : अंबाला हवाई तळावर गुरुवारी होणाऱ्या सोहळ्यात पाच राफेल विमानं हवाई दलात दाखल होणार आहेत. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्यासोबत फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली (Florence Parly) यादेखील कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. पूर्व लडाखमध्ये चीनसोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान फ्रान्सहून मागवण्यात आलेली पाच राफेल लढावू विमानं आज अंबाला हवाई तळावर औपचारिकरित्या भारतीय वायुसेनेत सामील केली जाणार आहेत. पारंपरिक ‘सर्वधर्म पूजा‘ करून राफेल वायुदलाच्या ताफ्यात सहभागी केले जातील.


या कार्यक्रमासाठी संरक्षण प्रमुख जनरल बिपीन रावत, वायुसेना प्रमुख आर के एस भदौरिया आणि संरक्षण सचिव अजय कुमार हेदेखील उपस्थित राहतील. इतिहासात आजचा दिवस एक महत्त्वाचा दिवस ठरणार असल्याची प्रतिक्रिया वायुसेनेच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केलीय.

संबंधित बातम्या :
वाचा : चीनला दिसणार राफेलची ताकद, अंबालामधील उद्याच्या मेगा शोमध्ये होणार गर्जना
वाचा :भारतीय भूमीवर झाले राफेलचे ‘हॅप्पी लँडिग’, संरक्षण मंत्रालयाने ट्विट केला व्हिडिओ

कार्यक्रमाची रुपरेषा

सकाळी १०.१५ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होील. त्यानंतर १०.२० मिनिटांनी सर्वधर्म पूजा पार पडेल. १०.३० वाजता फ्लाय पास्ट सुरू होईल. वक्त्यांना बोलण्यासाठी वेळ देण्यात आलीय. त्यानंतर औपचारिकरित्या राफेल एअरफोर्सचा एक भाग बनतील.

यानंतर राफेल अवकाशात उड्डाण घेत आपल्या ताकदीची एक झलक दाखवतील. सोबतच स्वदेशी एअरक्राफ्ट ‘तेजस’ही एअर डिस्प्लेमध्ये सहभागी होतील.

फ्रान्सहून भारतात दाखल

२७ जुलै रोजी या लढावू विमानांनी फ्रान्सच्या मॅरिगनेक एअरबेसहून उड्डाण घेत भारताकडे प्रयाण केलं होतं. ८५०० किलोमीटरचं अंतर कापत दोन दिवसानंतर म्हणजेच २९ जुलै रोजी राफेल विमानं अंबाला एअरबेसवर दाखल झाली होती. इथं वॉटर कॅनन सॅल्युट देऊन या विमानांचं भव्य स्वागत करण्यात आलं होतं. त्यानंतर राफेल विमानांची ट्रेनिंग सुरू होती.

इतर बातम्या :
वाचा :पूर्व लडाखमध्ये २०० मीटरवर भारत-चिनी सैनिक लष्कर आमनेसामने
वाचा :पँगाँग सरोवर परिसरात तणाव कायम; चिनी सैनिकांची वाढती संख्या
वाचा :कुठल्याही स्थितीत चिन्यांना सीमेत घुसू देऊ नका, भारतीय लष्कराचे कमांडर्सना आदेशSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *