Prithvi Shaw: बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीबरोबर डेटिंग करतोय पृथ्वी शॉ… सोशल मीडियावर फोटो व्हायरल – indian cricketer prithvi shaw is dating with bollywood actress prachi singh? rumors are in social media


भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ हा सध्याच्या घडीला चांगलाच चर्चेत आला आहे. पृथ्वी सध्या आयपीएलसाठी युएईला दाखल झाला आहे. पण तो आयपीएलमुळे नाही तर बॉलीवूडमधील एका अभिनेत्रीबरोबर डेटिंग करत असल्यामुळे चर्चेत आला आहे. पृथ्वीच्या काही फोटोंवरून ही गोष्ट चाहत्यांना समजली आहे. कारण पृथ्वीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत.

पृथ्वी हा आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स या संघाचील सदस्य आहे. दिल्लीच्या संघातून तो शिखर धवनबरोबर सलामीला येणार आहे. दिल्लीचा पहिला सामना किंग्स इलेव्हन पंजाबबरोबर २० सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे. पण आयपीएल सुरु होण्यापूर्वी पृथ्वीचे एक प्रेम प्रकरण पुढे आल्याचे म्हटले जात आहे.


पृथ्वी बॉलीवूडमधील अभिनेत्री प्राची सिंगबरोबर डेटिंग करत असल्याचे चाहत्यांना समजले आहे. कारण पृथ्वी आपल्या सरावाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहे. या व्हिडीओ आणि फोटोंवर प्राची कमेंट्स करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. प्राचीच्या या कमेंट्समधून या दोघांचे प्रेमप्रकरण सुरु असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगताना दिसत आहे.

prithvi

prithvi

prithvi

पृथ्वीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओखाली प्राचीने एक कमेंट केली आहे. या कमेंटमध्ये प्राची म्हणते की, ” मी या हसण्याला आता भरपूर मिस करत आहे.” त्याचबरोबर पृथ्वीच्या एका फोटोवर प्राचीने, यापेक्षा बलवान तू पहिल्यांदा कधीही दिसला नव्हतास, अशी कमेंट केली आहे. प्राचीच्या कमेंटला पृथ्वीनेही उत्तर दिले आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *