Maratha reservation: maratha reservation : आता मूक मोर्चे निघणार नाहीत, संघर्ष अटळ; मराठा आरक्षणावरून नितेश राणेंचा इशारा – nitesh rane slams maha vikas aghadi over maratha reservation


मुंबई:मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवण्यात राज्यसरकारला अपयश आले असून याला राज्यसरकारची बेपर्वाई वृत्ती कारणीभूत असल्याचा आरोप करत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आता मूक मोर्चे निघणार नाहीत. तर संघर्ष अटळ आहे, असा इशाराच राज्य सरकारला दिला आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करत राज्य मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला धारेवर धरले आहे. या सरकारने मराठ्यांचा विश्वासघात केला आहे. आज आमच्या समाजाचं भविष्य अंधारात गेलं आहे. कुठल्या तोंडाने या सरकारमधील मंत्र्यांना राज्यात फिरायला द्यायचं आणि कशासाठी?, असा सवाल करतानाच आता मूक मोर्चे नाहीच. आता संघर्ष अटळ आहे, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

तत्कालीन नारायण राणे समितीने संपूर्ण अभ्यासाअंती अहवाल सादर केला. त्यानंतर मराठा आरक्षण देण्यात आलं. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मराठा समाजाला केवळ आरक्षण देणार नाही तर टिकणारं आरक्षण देणार असल्याचं सांगितलं. पण ठाकरे सरकारच्या कार्यपद्धतीमुळे या आरक्षणाला स्थगिती मिळाली, असा आरोप राणे यांनी केला.

नात्यागोत्यातले वकील नेमल्याने मराठा आरक्षणाला स्थगिती; राणेंचा हल्लाबोल

यावेळी नितेश राणे यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचे सर्व मुद्दे खोडून काढले. चव्हाण यांनी ही तात्पुरती स्थिगिती असल्याचं म्हटलं आहे. मात्र, चव्हाण हे दिशाभूल करत आहेत. मी अनेक कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली. त्यांच्यामध्ये स्थगिती ही स्थगिती असते. तात्पुरती स्थगिती असं काही नसतं. स्थगिती कितीही वर्षांची असू शकते. त्यामुळे चव्हाण हे दिशाभूल करत असल्याचं सिद्ध होत आहे, असं राणे म्हणाले. २०१४-२०१९मध्ये फडणवीस सरकारने जे वकील दिले होते, तेच वकील ठेवल्याचा चव्हाण यांनी केलेला दावाही राणे यांनी खोडून काढला. तसेच आघाडी सरकारने तीन वकील बदलल्याचा दावाही त्यांनी केला. हे बदललेले वकीलच कोर्टात बाजू मांडत होते. शिवाय एक वकील तर अॅडव्होकेट्स ऑन रेकॉर्डही नव्हता. त्यामुळे त्यांना कोर्टात उभं राहण्याची परवानगीही नव्हती, असंही त्यांनी म्हटलं आहे.

अनपेक्षित, धक्कादायक आणि आश्चर्यकारक!

फुगा का फुटला याचे चिंतन करणार का?; शिवसेनेचा फडणवीसांना टोलाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *