Ladakh face off: लडाख तणाव; ​चिन्यांना झटका देत सर्वाधिक उंचीवर भारतीय लष्कराचा ताबा​ – indian army occupies heights overlooking the chinese army positions at finger 4 along pangong tso lake


नवी दिल्लीः चीनने LAC वर सैन्य तैनाती वाढवली असेल तर भारतानेही त्याच्या प्रत्येक कुरघोडीला उत्तर देण्याची तयार केली आहे. उंचीवरील युद्धात पटाईट असलेले भारतीय लष्कर लडाखमधील आघाडीच्या चौक्यांवर तैनात आहे. गेल्या काही दिवसांत भारतीय लष्कराने पँगाँग तलावाच्या उत्तर आणि दक्षिणेकडील दोन्ही बाजूंनी आपल्या जवानांची संख्या वाढवलीय आणि सुरक्षा बळकट केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे रशियात मॉस्को येथे भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये सीमेवरील तणाव दूर करण्याच्या मुद्द्यावर बैठक सुरू आहे.

भारतीय लष्कराच्या जवानांनी पँगाँग सरोवराच्या परिसरात असलेल्या फिंगर ४ भागातील सर्वात उंच डोंगरावर ताबा मिळवला आहे. या डोंगरावरून पँगाँग भागातील चिनी सैन्याच्या संपूर्ण हालचालींवर बारकाई लक्ष ठेवता येणार आहे.

चिनी सैन्याने भारतीय जवानांना उंच डोंगरांवरून हटण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यात चिनी तोंडघशी पडले. पँगाँग सरोवराच्या उत्तर, दक्षिण दिशेला चिनी सैनिक आणि वाहनांच्या हालचाली वाढल्या आहेत. काही ठिकाणी अवजड शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले सैनिकही अगदी जवळ तैनात आहेत. ही स्थिती म्हणजे ‘सर्वोच्च सतर्कता’ असं वर्णन एका अधिकाऱ्याने केलं आहे.

सीमेवरील स्थिती गंभीर आहे आणि एक गोळी चालली तरी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. या वादाचा केंद्रबिंदू पँगाँग सरोवर आहे. पण इतर भागातील परिस्थितीही फारशी बदलली नाहीए. गोगरा-हॉट स्प्रिंग्स, डेपासांग आणि दौलत बेग ओल्डि येथेही तैनाती वाढत आहे. पण या भागात सैनिक आमने-सामने नाहीत, असं अधिकाऱ्याने सांगितलं.

‘भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना राफेल एक कडक संदेश’

गेल्या चार महिन्यांपासून दोन्ही देशांत एलएसीवर ( LAC ) तणाव आहे. २९-३० ऑगस्टला पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावर झालेल्या संघर्षानंतर तणाव वाढला आहे. दोन्ही बाजूंकडून रणगाडे आणि सैनिकांच्या तैनातीत वाढ करण्यात आली आहे.

राफेलमुळे संपूर्ण क्षेत्रात भारताचा दबदबा असेलः फ्रान्सच्या संरक्षण मंत्री

भारतीय लष्कराने पँगाँग सरोवराच्या दक्षिण आणि उत्तरेकडील दोन्ही बाजूंच्या महत्त्वाच्या आणि उंच डोंगरांचा ताबा घेतला आहे. यामुळे चिनी सैन्य बिथरले आहे. ७ सप्टेंबरला चिनी सैनिकांनी रेझांग लाच्या उत्तरेकडील एका चौकीवर तैनात असलेल्या भारतीय जवानांना हटवून ते ठिकाण ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. पण हा प्रयत्न जवानांनी उधळून लावल्यानंतर बिथरलेल्या चिनी सैनिकांनी हवेत गोळीबार केला. भारतीय लष्करानेही चीनला ठोस संदेश दिला आहे. त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिले जाईल, हे दाखवून दिलंय.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *