Kolhapur Murder: आजोबांच्या अंत्यसंस्काराहून परतत होता तरूण; कोयत्याने वार करून निर्घृण हत्या – kolhapur murder 30 year old man killed in kurukali village in karveer


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: गवत कापण्याच्या व जनावरांनी गवत खाल्ल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून कुरुकली या गावात सकाळी एका युवकाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. कोल्हापूर-राधानगरी रोडवरील भोगावती महाविद्यालयाच्या रस्त्यावर ही घटना घडली.

काशिनाथ उर्फ किशोर साताप्पा पाटील (रा. कुरुकली ता. करवीर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गावात कापण्यावरून दोघांत वाद झाला. हा वाद वाढत गेला. त्यातून भर रस्त्यात हल्लेखोराने तरुणाचा खून केला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. घटनास्थळावरील दृश्य अंगाचा थरकाप उडवणारे होते. मयत किशोर यांच्या मानेवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने वर्मी घाव घातलेले होते. खून करणारा संशयित किरण हिंदूराव पाटील (रा. कुरुकली, ता. करवीर) हा स्वत:हून इस्पुर्ली पोलीस ठाण्यात हजर झाला.

कंगना रणौतविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार; मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याचा आरोप

धक्कादायक! १६ वर्षीय मुलीचं कोठडीतून अपहरण, ६ जणांनी केला बलात्कार

आठ दिवसांपूर्वी किशोर व किरण यांच्यात गवत कापण्यावरून आणि जनावरांनी गवत खाल्ल्यावरून वाद झाला होता. सकाळी आजोबांचे अंत्यसंस्कार करून किशोर शेताकडे निघाला होता. त्याची गाडी अडवून ऊस कापणीच्या कोयत्याने किरणने त्याच्यावर सपासप वार केले. मानेवर वार वर्मी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर, हवालदार के.डी. माने यांनी भेट देऊन पाहणी केली.

पिंपरी: राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दुचाकी दिवसाढवळ्या पळवली

भाजप नेता तरुणीचा करत होता पाठलाग; चपलेनं मारलं, व्हिडिओ व्हायरल

पत्नीची हत्या करून ‘तो’ पोहोचला थेट पोलीस ठाण्यातSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *