Khalistani terrorist: पाकिस्ताकडून खलिस्तानला पाठबळ; भारत-कॅनडाच्या सुरक्षितेला धोका – pakistan nurtured khalistani terrorists pose major threat to india and canada security


ओटावा: भारतात खलिस्तानवादी दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानने पुन्हा एकदा खलिस्तानी चळवळीला पाठबळ देणे सुरू केले आहे. या खलिस्तानी चळवळीमुळे भारत आणि कॅनडाच्या सुरक्षितेला धोका निर्माण झाला आहे. कॅनडातील एक प्रमुख थिंक टँक एमएल इन्स्टिट्यूटने आपल्या अहवालात याचा खुलासा केला आहे. खलिस्तान ही पाकिस्तानची महत्त्वकांक्षा असून कॅनाडामध्ये काही राजकीय गटांनी याला जिवंत ठेवले असल्याचेही इन्स्टिट्यूटने म्हटले आहे.

ज्येष्ठ पत्रकार टेरी मिलेवक्सीने यांनी आपल्या खलिस्तान: ए प्रोजेक्ट ऑफ पाकिस्तान या अहवालात म्हटले की, खलिस्तानी चळवळ ही कॅनडा आणि भारताच्या सुरक्षितेसाठी धोका निर्माण झाला आहे. खलिस्तानी दहशतवाद्यांनी ३५ वर्षांपूर्वी एअर इंडियाच्या विमानात स्फोट घडवून आणला होता. पाकिस्तानकडून सातत्याने खलिस्तानला पाठिंबा देण्यात येत असल्याचे टेरी यांनी सांगितले.

वाचा: पाकिस्तानच्या नावाशिवाय तुझी लढाई लढ; कंगनाला सल्ला

पंजाबमध्ये आता खलिस्तानचे समर्थक अगदी मोजकेच राहिले आहेत. त्यामुळे खलिस्तानवादी चळवळीला पाठबळ देण्यासाठी आणि ही चळवळ वाढवण्यासाठी पाकिस्तानने आता कॅनडावर लक्ष केंद्रीत केले असून मदतही वाढवली आहे.

खलिस्तानवादी दहशतवादी स्वतंत्र खलिस्तान देशासाठी २०२० मध्ये जनमत चाचणी करू इच्छितात. या जनमत चाचणीचा दिवस जवळ येत असल्यामुळे शीख समुदायामध्ये संशय निर्माण झाला आहे. जनमत चाचणीमुळे अतिकट्टरवादी विचारांना पाठबळ मिळणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

वाचा: अफगाणिस्तान: उपराष्ट्रपतींच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; तीन ठार, १२ जखमी

या जनमत चाचणीद्वारे कॅनडातील युवकांना आपल्या बाजूने वळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अहवालात म्हटले आहे. कॅनडा, ब्रिटन, अमेरिका आदी विविध देशांत खलिस्तान समर्थक संघटनांचे कार्य चालते.

वाचा: ‘या’ इस्लामिक देशात धर्म आणि सरकार वेगळे होणार; लोकशाही नांदणार!

खलिस्तानी चळवळ म्हणजे काय?

१९७० व ८० च्या दशकात पंजाबमध्ये शीखांचे स्वतंत्र देश अस्तित्वात यावा यासाठी चळवळ चालू झाली होती. ह्या स्वतंत्र देशाचे नाव खलिस्तान असे पंजाबी भाषेतील खालसा (पवित्र) या शब्दावरून ठेवण्यात आले होते. शीखांवर भारतात अन्याय होत असून त्यांची वेगळी धार्मिक, सांस्कृतिक ओळख पुसली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. शीखांच्या वेगळ्या राष्ट्राच्या मागणीला दहशतवाद व हिंसाचाराचे स्वरूप प्राप्त झाले. या चळवळीने भारत सरकारशी एक प्रकारचे युद्ध उभे ठाकले होते. खलिस्तानवादी चळवळीचा नेता आणि शीख तरुणांमध्ये लोकप्रिय संत जर्नेलसिंग भिंद्रनवाले याने सुवर्ण मंदिरात आपले बस्तान मांडले होते. पंजाबमध्ये होणाऱ्या हिंसाचारामागे भिंद्रनवालेचा हात होता. भारत सरकारने १९८४ मध्ये ऑपरेशन ब्लू स्टार राबवले. यामध्ये सुवर्ण मंदिरात असलेला भिंद्रनवाले लष्करी कारवाईत ठार झाला. यानंतरही काही काळ पंजाब अस्थिर होता. मात्र, कालांतराने प्रशासकीय हस्तक्षेप आणि स्थानिक मागण्या पूर्ण झाल्यानंतर परिस्थिती सामान्य झाली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *