Kangana Ranaut Comparing Mumbai To Pakistan Journalist Mehr Tarar Responds – पाकिस्तानच्या नावाशिवाय तुझी लढाई लढ; कंगनाला सल्ला


इस्लामाबाद: अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील कलाकार, दिग्दर्शकांसोबत पंगा घेणाऱ्या कंगनाने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिकेसोबतही वाद सुरू केला आहे. मुंबईला आधी पाकव्याप्त काश्मीर आणि मुंबई महापालिकेच्या कारवाईनंतर पाकिस्तान असे संबोधणाऱ्या कंगनावर नेटिझन टीका असताना आता पाकिस्तानमधूनही कंगनाला सल्ला देण्यात आला आहे. कंगनाने आपली लढाई पाकिस्तानशिवाय लढावी असा सल्ला पत्रकार मेहर तरारने दिला आहे.

मुंबईचा उल्लेख पाकव्याप्त काश्मीर असा केल्यानंतर कंगनाविरोधात राज्यभरात वातावरण तयार झाले. तिच्या या उल्लेखामुळे राजकीय खडाजंगीही झाल्या. त्यानंतर कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तोडल्यानंतर कंगनाने पाकिस्तान असे म्हणत कारवाईचे फोटो ट्विट केले. त्यामुळे कंगनाविरोधातील रोषात आणखीच भर पडली. यावर पाकिस्तानची पत्रकार मेहरने ट्विट करत कंगनाला सल्ला दिला. आपली राजकीय अथवा इतर मुद्यावरील लढाई ही पाकिस्तानच्या नावाशिवाय लढायला हवी असे ट्विट करत मेहरने कंगनाला सल्ला दिला.

वाचा: अमेरिका म्हणतेय, भारतापेक्षा पाकिस्तान अधिक सुरक्षित!

वाचा: बाळासाहेबांचे विचार विकून शिवसेना ‘सोनिया सेना’ झालीय: कंगना

मेहरच्या ट्विटनंतर काही कंगनाच्या समर्थकांनी मेहरला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना आश्रय दिला जातो त्यामुळे पाकिस्तानचे नाव का घेऊ नये असेही अनेकांनी म्हटले. याआधीदेखील मेहरने अभिनेत्री रिया चक्रवर्तीलाही पाठिंबा दर्शवला होता. रिया चक्रवर्तीविरोधात मीडिया ट्रायल सुरू असून मीडिया लिचिंग होत असल्याचा आरोप मेहेरने केला होता. रियाची मानसिक स्थिती काय असेल याची कल्पना असल्याचेही तिने म्हटले होते.

वाचा: मुख्यमंत्र्यांवर टीका करताना कंगनाची जीभ घसरली

सुनंदा पुष्करमुळे चर्चेत

काँग्रेस नेते शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला होता. त्याआधी सुनंदा यांनी पाकिस्तानच्या पत्रकार मेहर तरारवर आरोप करत थरूर यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याचा आरोप केला होता.

दरम्यान, मुंबईबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यानंतर शिवसेना व कंगना राणावत यांच्यात सुरू झालेल्या वादाची दखल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली आहे. मुंबई महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर घाईघाईनं केलेल्या कारवाईला राज्यपालांनी आक्षेप घेतला आहे. हे प्रकरण चुकीच्या पद्धतीनं हाताळण्यात आल्याचं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना कळवलं आहे. राज्यातील अनेक घडामोडींमध्ये बारकाईनं लक्ष घालणाऱ्या राज्यपालांनीही आता या वादात उडी घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांना तातडीनं राजभवनात बोलावून राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *