Kangana on Shiv Sena: बाळासाहेबांचे विचार विकून शिवसेना ‘सोनिया सेना’ झालीय: कंगना – shivsena turns into sonia sena, says kangana ranaut in new tweet


मुंबई: महापालिकेनं कार्यालयातील बेकायदा बांधकामावर केलेली कारवाई अभिनेत्री कंगना राणावत हिच्या चांगली जिव्हारी लागली आहे. कंगनानं शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका सुरूच ठेवली आहे. आज पुन्हा एकदा ट्वीट करून तिनं उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

‘माझ्या अनुपस्थितीत माझं घर तोडणाऱ्या गुंडांना महापालिकेचं नाव देऊ नका. राज्यघटनेचा इतका मोठा अपमान करू नका,’ असं कंगनानं म्हटलं आहे. ‘बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचारधारेवर शिवसेना उभी केली, ती विचारधारा विकून शिवसेना सत्तेसाठी ‘सोनिया सेना‘ झाली आहे, अशी टीका कंगनानं केली आहे.

कंगना ट्वीट

‘तुमच्या वडिलांचे चांगले कर्म तुम्हाला संपत्ती आणि वारसा देऊ शकतात, पण आदर-सन्मान तुमचा तुम्हालाच मिळवावा लागतो. माझं तोंड बंद कराल तर माझ्यानंतर लाखो मुखातून त्याचा प्रतिध्वनी उमटेल. तुम्ही किती तोंडं बंद करणार? किती जणांचे आवाज दाबणार? कधीपर्यंत तुम्ही सत्यापासून पळणार?,’ अशा प्रश्नांची सरबत्ती कंगनानं केली आहे. ‘तुम्ही आहात कोण? घराणेशाहीचा केवळ एक नमुना आहात,’ असा खोचक टोलाही कंगनानं उद्धव ठाकरे यांना हाणला आहे.
वाचा: कंगना-शिवसेना वादात राज्यपालांची एन्ट्री; प्रकरण दिल्लीपर्यंत जाणार?

वाचा: टीका करताना विषय समजून घ्या; पाटलांना रोहित पवारांचं कडक उत्तर

वाचा: फुगा का फुटला याचे चिंतन करणार का?; सेनेचा फडणवीसांना टोलाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *