India China: पूर्व लडाखमध्ये २०० मीटरवर भारत-चिनी सैनिक लष्कर आमनेसामने – india china : indian, chinese troops hold outposts only 200m apart in rezang la pass


वृत्तसंस्था, नवी दिल्ली :

भारत आणि चीन यांच्यादरम्यान पूर्व लडाखमधील सीमेवर गेले काही आठवडे सातत्याने तणाव असतानाच, भारत व चीनचे लष्कर परस्परांपासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर असलेल्या सीमावर्ती ठाण्यांवर आमनेसामने उभे ठाकण्याची परिस्थिती बुधवारी उद्भवली. त्यामुळे एकीकडे राजनैतिक तसेच लष्करी पातळीवर चर्चा सुरू असतानाही, दुसरीकडे पूर्व लडाखमधील तणाव निवळण्याची चिन्हे दिसत नसल्याचे समोर आले.

संबंधित घडामोडींची माहिती असलेल्या दिल्लीतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत व चीन या दोन्ही देशांचा दावा असलेल्या पँगाँग त्सो तलावाच्या दक्षिणेला किमान चार ठिकाणी दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर आले होते. दोन्ही बाजूंचे जवान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आतल्या बाजूला होते. मात्र परिस्थिती तणावपूर्ण आहे. दिल्लीतील अन्य एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रेझांग ला खिंडीजवळील भागात दोन्ही देशांचे सैनिक परस्परांपासून अवघ्या २०० मीटर अंतरावर उभे ठाकले होते. दोन्ही अधिकाऱ्यांनी आपले नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली.

वाचा :कुठल्याही स्थितीत चिन्यांना सीमेत घुसू देऊ नका, भारतीय लष्कराचे कमांडर्सना आदेश
वाचा :पँगाँग सरोवर परिसरात तणाव कायम; चिनी सैनिकांची वाढती संख्या

पूर्व लडाखच्या या भागातच सोमवारी, गेल्या कित्येक दशकांत प्रथमच गोळीबार झाला होता. भारत व चीन या दोन्ही देशांच्या लष्करांनी परस्परांवर हवेत गोळीबार केल्याचा आरोप केला होता.

सीमावर्ती भागातील भारतीय ठाण्याला घेरण्याच्या प्रयत्नांत चिनी लष्कराने हवेत गोळीबार केल्याचा आरोप भारतीय लष्कराने मंगळवारी केला होता, तर गस्त घालत असलेल्या चिनी सैनिकांना धमकावण्याच्या उद्देशाने भारतीय जवानांनीच गोळीबार केल्याचा उलट आरोप चिनी लष्कराने केला होता. पँगाँग त्सोच्या दक्षिणेकडील सुमारे ७० किमीचा बर्फाच्छादित दुर्गम भाग हा भारत-चीन यांच्यामधील ताज्या संघर्षाचे केंद्र ठरला आहे.

वाचा :चीनला दिसणार राफेलची ताकद, अंबालामधील उद्याच्या मेगा शोमध्ये होणार गर्जना
वाचा :भारत – चीन तणाव; दोन्ही देशांच्या ब्रिगेडियर्समध्ये हॉटलाइनवर खडाजंगी
वाचा :भाले, धारदार हत्यारं; चिन्यांना गलवानसारखा रक्तरंजित संघर्ष करायचा होता?Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *