crime news: नवजात बालकाला जिवंत जाळलं; स्निफर डॉगमुळे लागला मारेकऱ्यांचा शोध – newborn baby burning alive grandmother and father arrested in tenkasi district


मदुरई: नवजात बालकाला त्याच्या बापाने आणि आजीनेच जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. तेनकासी जिल्ह्यातील संकरनकोविल येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पहाटे चार वाजताच्या सुमारास रेल्वे फीडर रोडजवळील थिएटरजवळ काही जणांना एक नवजात बालक अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला.

या घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नवजात बालकाचा मृतदेह रुग्णालयात विच्छेदनासाठी नेला. घटनास्थळी स्निफर डॉग आल्यानंतर त्याच्या मदतीने नवजात बालकाच्या आईचा शोध घेतला. स्निफर डॉगने घटनास्थळापासून ३०० मीटरवर माग काढला. शंकरगोमती या महिलेच्या घरापर्यंत पोलीस पोहोचले. नवजात बालक या महिलेचे असल्याचा संशय पोलिसांना होता. कसून चौकशी केल्यानंतर ते बाळ तिचेच असल्याचे स्पष्ट झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, शंकर नावाच्या व्यक्तीशी तिचे प्रेमसंबंध होते. त्याच्यापासून ती गरोदर राहिली होती. तिने बुधवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास एका बाळाला जन्म दिला. तिच्या आईने नवजात बालकाला एका कापडात गुंडाळले आणि थिएटरजवळ नेले. तेथे त्याला जाळले. इंद्रा असे या आजीचे नाव आहे. पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. प्रसुतीनंतर महिलेची प्रकृती खालावली असून, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती बरी झाल्यानंतर तिची चौकशी करण्यात येणार असून, जबाबानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *