coronavirus pune: अॅन्टीजेन चाचणी निगेटिव्ह आल्यास त्या रुग्णाची ‘RTPCR’ चाचणी करणार – coronavirus health ministry guidelines antigen test rtpcr


म. टा. प्रतिनिधी, पुणेः करोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांची अॅन्टीजेन चाचणी निगेटिव्ह आल्यास पुन्हा त्या रुग्णाची ‘आरटी पीसीआर’ चाचणी अनेक मोठ्या राज्यांमध्ये केली जात नसल्याची माहिती समोर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर लक्षणे असूनही अॅन्टीजेन चाचणी निगेटिव्ह आल्यास त्या रुग्णाची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत.

या संदर्भात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. त्या तत्वांचा आधार घेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दोन प्रकारात ‘आरटीपीसीआर’ चाचणी ही पुन्हा करणे अनिर्वाय केले आहे. त्यामध्ये ताप, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्यावेळी रॅपिड अॅँटीजेन चाचणी केल्यास ती निगेटिव्ह आली तसेच निगेटिव्ह चाचणी आल्यापासून २ ते ३ दिवसांच्या आत लक्षणे विकसित होणाऱ्या लक्षणेहीन निगेटिव्ह प्रकरणांमध्ये आरटी पीसीआर चाचणी करणे अनिवार्य केले आहे.

करोना बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध; ३६०० पथके फिल्डवर!

पुण्यात बेड पडणार अपुरे; ‘ही’ धडक मोहीम घेणार हातीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *