coronavirus in maharashtra: Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात करोनाबळींचा उच्चांक; आज ४४८ मृत्यूंची नोंद, २३४४६ नवे बाधित – 23446 new covid 19 cases and 448 deaths reported in maharashtra today


मुंबई: राज्यात आज ४४८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा ठरला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण २८ हजार २८२ जणांना करोनामुळे प्राण गमवावे लागले असून सध्याचा मृत्यूदर २.८५ टक्के असल्याने चिंता कायम आहे. ( Coronavirus In Maharashtra Latest Updates )

राज्यातील रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. आज पुन्हा एकदा राज्यात २३ हजारावर नवीन करोना बाधितांची नोंद झाली. राज्यात गेल्या २४ तासांत २३ हजार ४४६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर १४ हजार २५३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील एकूण रुग्णसंख्या आज ९ लाख ९० हजार ७९५ वर पोहचली. त्यात २ लाख ६१ हजार ४३२ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

राज्यात आतापर्यंत ४९ लाख ७४ हजार ५५८ व्यक्तींच्या करोना चाचण्यात घेण्यात आल्या. त्यातील १९.९ टक्के (९ लाख ९० हजार ७९५) जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले तर उर्वरित चाचण्या निगेटिव्ह आल्या. राज्यात करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ७ लाखाचा टप्पा ओलांडून आता ७ लाख ७१५ इतकी जाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ७०.७२ टक्के आहे. तो काहीसा दिलासा ठरला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *