ahmednagar robbery: नगर: दरोडेखोर घरात घुसले अन्… केडगावमध्ये मध्यरात्री सशस्त्र दरोडा – ahmednagar robbery 4 armed men looted gold jewellery in kedgaon


म . टा. प्रतिनिधी, नगर : अहमदनगर शहराजवळील केडगाव परिसरातील वैष्णवनगर येथे चार दरोडेखोरांनी घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवून मारहाण केली व पाच तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. काल, बुधवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी आज कोतवाली पोलीस ठाण्यात रमाकांत पराळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चार व्यक्तींच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केडगाव येथील वैष्णवनगर भागात पराळे हे राहतात. बुधवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास चार दरोडेखोर हे पराळे यांच्या घराभोवती असणाऱ्या कपाऊंडवरून उडी मारून आत आले, व घरात घुसले. त्यानंतर त्यांनी घरातील लोकांना बंदुकीचा धाक दाखवत दम भरला. तसेच त्यांना मारहाण करीत पराळे यांच्या गळ्यातील पाच तोळे सोन्याची साखळी काढून घेतली. त्यानंतर हे दरोडेखोर पसार झाले. या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चार व्यक्तींच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन रणदिवे करीत आहेत. दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.

लज्जास्पद! वहिनीचे आंघोळ करताना काढले फोटो; केलं लैंगिक शोषण

पिंपरी: राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दुचाकी दिवसाढवळ्या पळवली

भाजप नेता तरुणीचा करत होता पाठलाग; चपलेनं मारलं, व्हिडिओ व्हायरल

पत्नीची हत्या करून ‘तो’ पोहोचला थेट पोलीस ठाण्यातSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *