सुशांतसिंह राजपूत केस: स्वतंत्र सेल.. बाजूला इंद्राणी मुखर्जीची बराक, भायखळा तुरुंगात अशी गेली रियाची पहिली रात्र – sushant singh rajput rhea chakrabortys first night at byculla jail


मुंबई- ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने पहिली रात्र मुंबईच्या भायखळा कारागृहात घालवली. रियाला कारागृहाच्या तळ मजल्यावरील सेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. ८ सप्टेंबर रोजी अमली पदार्थांसंबंधित प्रकरणात नारकोटिक्स (एनसीबी) कंट्रोल ब्युरोने तिला अटक केली होती.

एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, रियाला बुधवारी सकाळी सामान्य बराकीत ठेवण्यात आलं होतं. मात्र नंतर सुरक्षेच्यादृष्टीने तिला वेगळ्या सेलमध्ये ठेवण्यात आलं. असं म्हटलं जातं की, शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जी हिचा सेलही रियाच्या जवळच आहे. रिपोर्टनुसार रिया ज्या सेलमध्ये आहे तो सेल जेल सर्कल- १ मध्ये आहे.

या सेलच्या तीनही बाजूंना भिंती आहेत आणि समोर ग्रील आहेत. बुधवारी कारागृहात रियाला संध्याकाळी ६ वाजताच रात्रीचं जेवण देण्यात आलं. तिला जेवणात दोन चपात्या, भाजी आणि भात होता. नियमांनुसार, तिला आज सकाळी १० वाजता नाश्ता देण्यात आला.

मंगळवारी रियाला ड्रग्ज प्रकरणात १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. त्या दिवशी सर्व कागदपत्रांना आणि इतर कारवाईला उशीरा झाल्यामुळे तिला पहिल्या रात्री एनसीबीच्या लॉकअपमध्येच ठेवण्यात आलं होतं. मात्र दुसऱ्या दिवशी तिची रवानगी भायखळाच्या कारागृहात करण्यात आली, रियाला अटक करण्यापूर्वी तिचा भाऊ शौविक, सुशांतचा घर व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा आणि सुशांतचा कर्मचारी दिपेश सावंत यांना एनसीबीने अटक केली होती. गुरुवारी रिया आणि तिचा भाऊ शौविक यांच्या जामीन अर्जावर विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *