Rhea Chakraborty: रियापाठोपाठ शौविकही भायखळा तुरुंगात – shauvik will be going byculla jail after rhea chakraborty


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्ती हिची रवानगी भायखळा तुरुंगात करण्यात आली आहे. अमली पदार्थांचा वापर केल्यासंदर्भात एनसीबीने तिला मंगळवारी अटक केली होती. दरम्यान, रियाचा भाऊ शौविक याला देखील भायखळा तुरुंगातच हलवले जाणार आहे.

मंगळवारी रात्रभर रियाला नारकॉटिक्स कंट्रोल ब्युरोच्या बीकेसी कार्यालयातील कोठडीत ठेवण्यात आले होते. बुधवारी सकाळी मात्र तिला भायखळ्याला हलविण्यात आले. या प्रकरणातील अन्य आरोपी रियाचा भाऊ शौविक, या दोघांना अमली पदार्थ पुरविण्याचा आरोप असलेला सॅम्युएल मिरांडा व सुशांतचा घरातील मदतनीस दीपेश सावंत, या तिघांनाही भायखळा तुरुंगातच हलविले जाणार आहे. रियाला २२ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

मीतू सिंहची चौकशी

याप्रकरणी तपासात एनसीबीने उडी घेतल्यापासून सीबीआयकडून चौकशी जवळपास थांबविण्यात आली आहे. मागील दोन दिवसांत सीबीआयने सुशांतची बहिण मीतू सिंह हिची चौकशी केली. परंतु बुधवारी तर कुणालाही सोबीआयने चौकशीसाठी बोलवले नाही. त्याचप्रमाणे ईडीनेदेखील दहा दिवसांपासून तपास पूर्णपणे थांबविला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *