coronavirus in thane: Coronavirus In Thane: ठाण्यातील स्थिती मुंबईपेक्षा गंभीर; २४ तासांत ७५ करोनाबळी – thane district sees record 75 coronavirus deaths


ठाणे:ठाणे जिल्ह्यात शनिवारी मुंबई पेक्षा जास्त करोनाबळी गेले. मुंबईत ५८ तर ठाण्यात ७५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून यामध्ये सर्वाधिक ४० रुग्णांच्या मृत्यूची नोंद भिवंडीतील आहेत. बदलापूरमध्ये एकही मृत्यूची नोंद नाही. तर दिवसभरात नवीन १ हजार ५६६ रुग्ण वाढल्याने बाधितांचा एकूण आकडा ९६ हजार ९६० वर गेला आहे. यापैकी ७७ हजार ४५४ रुग्ण बरे झाले असून सध्या १६ हजार ७८८ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. ( Coronavirus In Thane )

वाचा: राज्याने ओलांडला ५ लाखांचा टप्पा

जिल्ह्यातील मृतांचा आकडा ७५ ने वाढल्यानंतर मृतांची एकूण संख्या २ हजार ७१८ इतकी झाली आहे. यामध्ये शनिवारी ठाण्यात चार (एकूण मृत्यू ६९२) तर कल्याण-डोंबिवली १० (४३१), नवी मुंबई ७ (४६१), मिरा-भाईंदर ५ (३१२), उल्हासनगर ४ (१५४), भिवंडी ४० (२५८), अंबरनाथ १ (१६५) आणि ठाणे ग्रामीणमध्ये ४ (१९४) मृत्यूची नोंद झाली. आजपर्यंतचा बदलापूरमधील मृतांचा एकूण आकडा ५१ आहे. तर जिल्ह्यात दिवसभरात १ हजार ५६६ नवीन रुग्णांची भर पडली असून ठाणे महापालिका क्षेत्रात २८८ नवीन रुग्णांची वाढ झाली. नवी मुंबईमध्ये नवीन ४५५ रुग्ण वाढल्याने बाधितांचा आकडा १८ हजार १४९ इतका झाला आहे. नवी मुंबईत मागील दोन दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येपेक्षा करोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा आकडा हा जास्त असल्याने नवी मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

वाचा: उद्धव ठाकरेंची पुन्हा बाजी, देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये स्थान

पालिका म्हणते, भिवंडीत शनिवारी एकाही मृत्यूची नोंद नाही!

भिवंडीतील ४० रुग्णांच्या मृत्यूच्या नोंदीबाबत भिवंडी महापालिका प्रशासनाला विचारल्यानंतर शनिवारी एकाही मृत्यूची नोंद नाही. परंतु मे, जून आणि जुलैमध्ये भिवंडीतील रुग्ण मुंबई आणि ठाणे परिसरात उपचारासाठी गेले होते आणि त्यांचे मृत्यू रुग्णालयात झाले होते. त्याची नोंद आता ठाणे, मुंबईकडून आली आहे. म्हणून ४० रुग्णांच्या मृत्यूची नोंद दाखवत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

राज्यात १२ हजार ८२२ नवीन रुग्ण

राज्यात गेल्या २४ तासांत करोनाच्या सुमारे ७७ हजार ३७५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज ११ हजार ८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६७.२६ टक्के एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख ३८ हजार ३६२ रुग्ण बरे झाले आहेत. आज १२ हजार ८२२ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४७ हजार ४८ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत.

वाचा: संजय दत्त लीलावतीत दाखल; करोना चाचणी अहवालाची प्रतीक्षाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *