Yerwada Jail: येरवडा जेलमधील ‘वेताळ’ रात्रीच्या अंधारात झाला गायब – inmates escapes from yerwada jail in pune


म. टा. प्रतिनिधी, येरवडा: करोनाच्या पार्श्वभूमीवर जात पडताळणी कार्यालयाच्या आवारातील शासकीय वसतिगृहात उभारलेल्या तुरुंगातून रविवारी रात्री आणखी एक कैदी पसार झाला. या कैद्याने स्वच्छतागृहातून पलायन केल्याची माहिती समजते. याआधी मागील महिन्यात दोन कैद्यांनी स्वच्छतागृहाच्या खिडकीचे गज उचकटून पलायन केले होते. त्यानंतर आणखी एका कैद्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या तुरुंगातून कैदी पळून जाण्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे येथील सुरक्षेव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

अनिल विठ्ठल वेताळ (रा. गणेशनगर, डिग्रजवाडी, कोरेगाव- भीमा) असे पळून गेलेल्या कैद्याचे नाव आहे. या प्रकरणी तुरूंग कर्मचारी विशाल जाधव यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर येरवडा तुरुंग प्रशासनानं जात पडताळणी कार्यालयाच्या आवारात शासकीय वसतिगृहात तात्पुरत्या स्वरुपात तुरुंग उभारलं आहे. या ठिकाणी कच्च्या कैद्यांना ठेवले जाते. विठ्ठल वेताळ याच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे २३ जून रोजी येरवडा येथील तात्पुरत्या तुरुंगात ठेवण्यात आले होते.

पुणे हादरले; कोचिंग क्लासच्या शिक्षकानं तरुणीवर केला बलात्कार

पुण्यात खळबळ; तरूणाचा गोळ्या घालून खून

रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास स्वछतागृहात जाण्याचा बहाणा त्याने केला. त्यामुळे सुरक्षारक्षक कर्मचारी त्याला स्वछतागृहात घेऊन गेले. त्यानंतर स्वच्छतागृहाच्या आतील बाजूला असलेल्या दाराची कडी तोडून तो व्हरांड्यातून पळून गेला. बराच वेळ आवाज दिला. पण वेताळ बाहेर न आल्याने पाहणी केल्यावर तो पळून गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, पोलीस कैद्याचा शोध घेत आहेत.

जूनमध्ये दोन कैदी झाले होते पसार

करोनाच्या पार्श्वभूमीवर येरवडा कारागृहाजवळ उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या कारागृहातून दोन कैद्यांनी जूनमध्ये पलायन केल्याची घटना घडली होती. बाथरूमच्या खिडकीचे गज उचकटून दोघे पळाले होते. त्यामुळं कारागृह प्रशासनामध्ये खळबळ उडाली होती. पसार झालेल्या कैद्यांचा शोध घेण्यात आला. हर्षद सय्यद (वय २०, रा. कासारवाडी) व आकाश बाबूलाल पवार (वय २४ रा. काळेवाडी, पिंपरी) अशी कारागृहातून पसार झालेल्या दोघांची नावे होती. दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्यावर जबरी चोरी, खूनाचा प्रयत्न करणे अशा प्रकराचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, त्यानंतर लगेच फरार झालेल्या कैद्यांपैकी एका कैद्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकानं पिंपळे सौदागर येथून अटक केली होती.

तरूण झोपेतच होता, इतक्यात…सांगलीत घडली हादरवणारी घटना

शाळेनं १४ वर्षीय विद्यार्थिनीवर गुपचूप केले अंत्यसंस्कार; काय घडलं वाचा!Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *