BJP: BJP भाजपला काय हवंय? लॉकडाऊनला पुण्यात विरोध, नगरमध्ये पुढाकार! – bjp opposes pune lockdown initiative in ahmednagar


नगर: करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर पुणे पालिका हद्दीत पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्याच्या निर्णयावर तेथील भाजपच्या नेत्यांनी टीका केली होती. मात्र, अहमदनगर मध्ये भाजप आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांनीच लॉकडाऊन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, आज दुपारी महापालिका पदाधिकारी, अधिकारी आणि लोकप्रतिनिंधीची बैठक झाली. त्यामध्ये १६ जुलैपासून नगरला पुन्हा लॉकडाऊन किंवा जनता कर्फ्यू करण्यासंबंधी चर्चा झाली असून लवकरच निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. (BJP ‘s Stand On lockdown )

नगरमध्येही आता करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. एकूण रुग्णसंख्या आता हजाराच्या जवळ आली आहे. जिल्ह्यात २२ जणांचा मृत्यू झाला आहे. नगर शहरातील आकडेही वाढत आहेत. शहरात पाच मृत्यू झाले असून त्यात तीन व्यापाऱ्यांचा समावेश आहे.

वाचा: मोदी, शहा, फडणवीसांनाही ‘नया है वह’ म्हणायचे का?; शिवसेनेचा पलटवार

संगमनेर तालुक्यातही करोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ गेल्या आठवड्यात येथे आले होते. मात्र, यापुढे जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन केला जाणार नाही, हे त्यांनी ठामपणे सांगितले होते. असे असले तरी महापालिका पदाधिकाऱ्यांनी आता यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. नगरच्या महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादीची संयुक्त सत्ता आहे. महापौरपद भाजपकडे आहे. पुण्यासह अन्य ठिकाणी लॉकडाऊनचा निर्णय झाल्यानंतर आज नगरमध्येही त्यासाठी बैठक घेण्यात आली. महापौर बाबासाहेब वाकळे, आमदार संग्राम जगताप, आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकारी बैठकीला उपस्थित होते. १६ जुलैपासून लॉकडाऊन करण्यासंबंधी प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. याच बैठकीला नागरिकांच्या एका संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी या बैठकीची माहिती देणारा आणि नागरिकांनी पूर्व तयारी करून ठेवावी, असा मेसेज सदस्यांना दिला. मात्र, तो शहरात वेगाने व्हायरल झाला. त्यावर उलट सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या.

वाचा: मुंबईत पुन्हा १०० टक्के लॉकडाऊन?; महापालिका आयुक्त म्हणाले…

दरम्यान, भाजप प्रणित पंडित दीनदयाळ परिवार या संस्थेनेही शहरात लॉकडाऊन करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी निवेदन पाठविले आहे. नगर शहरात वाढत असलेला करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी करोनाची साखळी तातडीने तुटणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्वरित नगरच्या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. राज्यात इतर जिल्ह्यात पुन्हा केलेल्या लॉकडाऊनप्रमाणे नगर शहरातही तातडीने संपूर्ण लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनास द्यावे. नगरचे पुणे-औरंगाबाद होवू देऊ नका, अशी मागणी त्यामध्ये करण्यात आली आहे.

वाचा: ‘पावसात भिजूनही तुमच्या किती जागा आल्या हे सर्वांनी पाहिलंय’

कंटेन्मेंट झोन झाल्यामुळे नगरची मुख्य बाजारपेठ गेल्या चौदा दिवसांपासून बंद होती. ती आजच सुरू झाली. तर दुसरा कंटेन्मेंट झोन झाल्याने उरलेला भाग आजपासून बंद झाला आहे. आता जनता कर्फ्यू किंवा लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास पुन्हा सर्व व्यवहार बंद ठेवावे लागणार आहेत. मात्र, बाजारपेठेत काही व्यापारी आणि त्यांच्या कुटुंबियांनाच करोनाचा फटका बसल्याने यासंबंधी कोणी उघडपणे बोलत नाही. पुण्यात विरोध करणाऱ्या भाजपच्या पुढाकारातून हा निर्णय होत असल्याची चर्चा मात्र राजकीय वर्तुळात सुरू आहे.

वाचा: पुणे, ठाण्यानंतर रायगड; १५ जुलैच्या मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊनSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *